"तुम्ही लिमिट क्रॉस केली...", रितेश देशमुखने रुचिताला चांगलंच झापलं, भाऊच्या धक्कावर घेणार शाळा; प्रोमो व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 11:00 IST2026-02-07T10:54:19+5:302026-02-07T11:00:12+5:30

भाऊच्या धक्कावर रितेश रुचिताची घेणार शाळा, काय घडणार? प्रोमो पाहून प्रेक्षक उत्सुक

bigg boss marathi 6 riteish deshmukh slams ruchita jamdar latest promo goes viral | "तुम्ही लिमिट क्रॉस केली...", रितेश देशमुखने रुचिताला चांगलंच झापलं, भाऊच्या धक्कावर घेणार शाळा; प्रोमो व्हायरल 

"तुम्ही लिमिट क्रॉस केली...", रितेश देशमुखने रुचिताला चांगलंच झापलं, भाऊच्या धक्कावर घेणार शाळा; प्रोमो व्हायरल 

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'चं सहाव्या पर्व सध्या स्पर्धकांमधील वाद आणि भांडणांमुळे चर्चेत आहे.या शोमध्ये दररोज नवनवीन ड्रामा पाहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीचं हे पर्व सुरु होऊन जवळपास चार आठवड्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र, हा आठवडा सर्वाधिक चर्चेत राहिला. आपल्या आक्रमक स्वभावामुळे पहिल्या दिवसापासून चर्चेत असलेल्या रुचिता जामदारचा पुन्हा एकदा तोच राग प्रेक्षकांना पाहायला मिळाला. यावेळी तिचा वाद दीपाली सय्यदसोबत झाला आणि हा वाद विकोपाला गेला. रुचिताच्या या वर्तणुकीमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. इतकंच नाहीतर चक्क शोमध्ये स्पर्धकांना धमकी दिल्याने दिव्याला बिग बॉसने बाहेरचा रस्ता दाखवला.


अशातच आता भाऊच्या धक्क्यावर काय होणार, रितेश कोणाची शाळा घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यात आता कलर्स मराठी वाहिनीने नुकताच एक नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये भाऊच्या धक्क्यावर रितेश रुचितावर भडकलेला पाहायला मिळतोय. त्यादरम्यान, रितेश तिला म्हणतो, "रुचिता या घराचा सगळ्यात मोठा व्हिलन तुम्ही ठरला आहात, सतत उद्धट वागायचं, टास्क रद्द कसा होईल तेच बघायचं. एकही दिवस असा सोडला नाही जिथे तुम्ही लिमिट क्रॉस केली नाही," असं रितेश देशमुख म्हणाला. त्यानंतर 'ही कुऱ्हाड घ्या' म्हणत रुचिताच्या हातात कुऱ्हाड देण्यात आली.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर हा प्रोमो तुफान व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. तसेच "दिव्याच्या ऐवजी रुचिताला काढायला पाहिजे होतं…","बाहेर तर ही जायला पाहिजे होती...", अशा कमेंट्स करत प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. 

Web Title : रितेश देशमुख ने 'बिग बॉस' में रुचिता को सीमा लांघने पर डांटा।

Web Summary : 'बिग बॉस मराठी 6' में रितेश देशमुख ने रुचिता को उनके अभद्र व्यवहार और कार्यों में लगातार बाधा डालने के लिए फटकार लगाई। उन्होंने उस पर घर का सबसे बड़ा खलनायक होने और प्रतिदिन सीमाएं लांघने का आरोप लगाया, जैसा कि वायरल प्रोमो में देखा गया है।

Web Title : Ritesh Deshmukh scolds Ruchita for crossing limits on 'Bigg Boss'.

Web Summary : Ritesh Deshmukh confronts Ruchita on 'Bigg Boss Marathi 6' for her rude behavior and constant task disruptions. He accuses her of being the biggest villain in the house and exceeding limits daily, as seen in the viral promo.