"ऐ चुप...तुझी बोलायची औकात आहे का?", राकेश बापट अनुश्रीवर पुन्हा चिडला, थेट लायकीच काढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 13:28 IST2026-01-22T13:28:06+5:302026-01-22T13:28:52+5:30
बिग बॉस मराठीच्या घरात राशन टास्क पार पडला. या टास्कनंतर अनुश्री आणि प्राजक्ता शुक्रे यांच्यात भांडण झालं. अनुश्रीने प्राजक्ताला शिवीगाळही केली. त्यानंतर घरातलं कोणतंच काम करणार नाही असा पवित्रा अनुश्रीने घेतला. त्यावरुन आता पुन्हा राकेश आणि अनुश्रीमध्ये वाजणार आहे.

"ऐ चुप...तुझी बोलायची औकात आहे का?", राकेश बापट अनुश्रीवर पुन्हा चिडला, थेट लायकीच काढली
Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीच्या घरात राकेश बापट आणि अनुश्री माने यांच्यातील भांडण संपण्याचं नावच घेत नाहीये. राकेशने अनुश्रीच्या हाताला धरुन बेडवरुन उठवल्यामुळे त्यांच्यात वाद झाला होता. अनुश्री आणि रुचिता जामदार हिने राकेशवर गंभीर आरोप केले होते. परवानगी न घेता मुलीच्या अंगाला कसं काय हात लावू शकतो? असं रुचिता म्हणाल्यानंतर राकेशचा पारा चढला होता. त्यानंतर टास्कमध्येही अनुश्री आणि राकेशमध्ये वादावादी झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
नुकतंच बिग बॉस मराठीच्या घरात राशन टास्क पार पडला. या टास्कनंतर अनुश्री आणि प्राजक्ता शुक्रे यांच्यात भांडण झालं. अनुश्रीने प्राजक्ताला शिवीगाळही केली. त्यानंतर घरातलं कोणतंच काम करणार नाही असा पवित्रा अनुश्रीने घेतला. त्यावरुन आता पुन्हा राकेश आणि अनुश्रीमध्ये वाजणार आहे. घरातील काम करत नसल्यामुळे राकेश चिडल्याचं दिसत आहे. बिग बॉसच्या घरातला एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत लिव्हिंग एरियामध्ये सगळे बसल्याचं दिसत आहे. राकेश म्हणतो, "जेव्हा ती काल बोलत होती तेव्हा तुम्ही तिला काहीच का बोलले नाहीत? माझ्या माणसाबद्दल असं कोणी बोलत असेल तर मी बोलेन की तू चुप कर. तुझी लायकी नाहीये बोलायची...स्पेशली अशी मुलगी जी घरात एक काम करत नाहीये".
राकेशचं बोलणं ऐकल्यानंतर अनुश्री गार्डन एरियामधून घरात येत असल्याचं दिसत आहे. ती राकेशला चिडून बोलते, "तू आमची लायकी का काढतोस? त्यानंतर राकेश भडकतो आणि अनुश्रीला बोलतो की "तू माझ्याशी बोलू नकोस. शांत बस". मग अनुश्रीचाही पारा चढल्याचं दिसत आहे. ती राकेशला म्हणते, "मी बोलणार... घरात राहते मी...तर मी बोलणार तू चूप". त्यानंतरही घरातले इतर सदस्य काहीच बोलत नाहीत. ते पाहून राकेश आणखीनच भडकतो आणि सगळ्यांना उद्देशून म्हणतो "आता तुम्ही सगळे गप्प बसा". आता भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख याबाबत घरातील सदस्यांची कानउघाडणी करणार का हे पाहावं लागेल.