Bigg Boss Marathi 6: पहिल्याच टास्कमध्ये घरात हाय वोल्टेज ड्रामा; 'जुन्नरच्या वाघिणी'ला चक्कर आली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 10:09 IST2026-01-13T10:05:09+5:302026-01-13T10:09:37+5:30
'बिग बॉस मराठी ६' जुन्नरची वाघीण दिव्या शिंदेची टास्क खेळताना चांगलीच दमछाक झाल्याने ती बेशुद्ध झाली. त्यामुळे सर्व सदस्यांना चांगलाच धक्का बसला

Bigg Boss Marathi 6: पहिल्याच टास्कमध्ये घरात हाय वोल्टेज ड्रामा; 'जुन्नरच्या वाघिणी'ला चक्कर आली?
'बिग बॉस मराठी ६' सुरु अवघे दोनच दिवस झाले आहेत. या दोनच दिवसांमध्ये घरात ड्रामा बघायला मिळतोय. 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात पहिला टास्क पार पडणार आहे. या टास्कमध्ये घरातील काही सदस्यांना घरासाठी जेवणाचं साहित्य जमवायचं आहे. यासाठीच बिग बॉसने सदस्यांना मिशन राशन हा टास्क खेळायला सांगितला. त्यावेळी 'जुन्नरची वाघीण' अशी ओळख असलेल्या दिव्या शिंदेला चक्कर आल्याने सर्वांना धक्का बसला
दिव्या पडली बेशुद्ध, काय घडलं?
ज्या सदस्यांनी मेहनतीचा पर्याय निवडला त्यांच्यामध्ये 'मिशन राशन' हा टास्क खेळवण्यात आल्याचं दिसतंय. यामध्ये सागर कारंडे, दिव्या शिंदे, प्रभू शेळके, रुचिता जामदार, रोशन भजनकर हे सदस्य सहभागी होते. टास्क खेळताना या सदस्यांना घरातील मोठी भांडी गार्डन एरियात आणायची होती. मोठा टोप, कढई, पलेता, चमचे, वाट्या असं सर्व त्यांना गार्डन एरियात एकत्र करुन ठेवायचं होतं. त्यावेळी दिव्या जोमाने टास्क खेळत होती. पण एका क्षणी धावताना दिव्याला अस्वस्थ वाटलं. त्यामुळे ती गार्डन एरियात बेशुद्ध होऊन तिला चक्कर आलेली दिसली.
दिव्याची अवस्था पाहून सर्व सदस्यांना चांगलाच धक्का बसला. ''कोणीतरी डॉक्टरांना बोलवा'', अशी मागणी केली. दिव्याला धाप लागली होती. एकूणच 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात पहिल्याच टास्कमध्ये हाय वोल्टेज ड्रामा बघायला मिळाला. आता दिव्या खरंच बरी आहे का? तिला डॉक्टरांची मदत मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे. 'बिग बॉस मराठी ६' सोमवार ते रविवार रात्री ८ वाजता कलर्स मराठीवर बघायला मिळेल.