Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६'चा पहिला स्पर्धक समोर, प्रोमोमधल्या 'तिला' चाहत्यांनी ओळखलं
By कोमल खांबे | Updated: January 7, 2026 15:47 IST2026-01-07T15:46:52+5:302026-01-07T15:47:32+5:30
Bigg Boss Marathi 6 Contestants: कलर्स मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडिया हँडलवरुन 'बिग बॉस मराठी ६' मधील पहिल्या स्पर्धकाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६'चा पहिला स्पर्धक समोर, प्रोमोमधल्या 'तिला' चाहत्यांनी ओळखलं
Bigg Boss Marathi 6 Contestants: 'बिग बॉस मराठी ६' या नव्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या ११ जानेवारीपासून 'बिग बॉस मराठी'चं नवं पर्व सुरू होणार आहे. यंदाच्या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. सोशल मीडियावर 'बिग बॉस मराठी ६'च्या घरातील स्पर्धकांची चर्चाही रंगली आहे. आता 'बिग बॉस मराठी ६'च्या घरातील पहिला स्पर्धक समोर आला आहे.
कलर्स मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडिया हँडलवरुन 'बिग बॉस मराठी ६' मधील पहिल्या स्पर्धकाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये एक महिला साडी नेसून ग्लॅमरस अंदाजात दरवाजात उभी असल्याचं दिसत आहे. "फॅशनच्या जगातील ही सुंदरी, भल्याभल्यांवर पडणार भारी", असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे. खरं तर हा Aiने बनवलेला प्रोमो आहे. पण तरीदेखील चाहत्यांनी या प्रोमोमधली व्यक्ती ओळखली आहे. या प्रोमोच्या कमेंट सेक्शनमध्ये ही व्यक्ती कोण असेल याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे. काहींनी युट्यूबर आणि अभिनेत्री असलेल्या उर्मिला निंबाळकरचं नाव घेतलं आहे. तर काही जण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सोनाली राऊत असल्याचं म्हटलं आहे.
आता 'बिग बॉस मराठी ६'च्या घरातील ही व्यक्ती नक्की कोण आहे ते येत्या रविवारी कळेल. 'बिग बॉस मराठी ६' हे नवं पर्व रितेश देशमुख होस्ट करणार आहे. रितेशला पुन्हा एकदा भाऊच्या धक्क्यावर पाहण्यासाठी चाहतेही आतुर आहेत. ११ जानेवारीपासून रात्री ८ वाजता प्रेक्षकांना 'बिग बॉस मराठी ६' पाहता येणार आहे.