टोळी फुटली? 'बिग बॉस'च्या घरात रुचिता अन् अनुश्रीमधील वाद टोकाला गेला, नेमकं काय घडलं?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 15:43 IST2026-02-05T15:40:13+5:302026-02-05T15:43:41+5:30

रुचिताने मांडला उच्छाद, जिवलग मैत्रीणीसोबतच जोरदार राडा, काय घडलं? प्रोमो व्हायरल 

bigg boss marathi 6 anushree mane and ruchita jamdar fight latest promo viral  | टोळी फुटली? 'बिग बॉस'च्या घरात रुचिता अन् अनुश्रीमधील वाद टोकाला गेला, नेमकं काय घडलं?  

टोळी फुटली? 'बिग बॉस'च्या घरात रुचिता अन् अनुश्रीमधील वाद टोकाला गेला, नेमकं काय घडलं?  

Bigg Boss Marathi 6 :  'बिग बॉस मराठी'चा यंदाचा सीझन कोणत्या ना कोणत्या कारणामुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे. या घरातील स्पर्धक, त्यांच्यातील मैत्री आणि वाद लक्ष वेधून घेत आहेत. जसजसे दिवस सरत आहेत तसा प्रत्येक स्पर्धक आपल्या खेळीने चर्चेत येत आहे. अशातच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरात मोठा राडा पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता मैत्री आणि नात्यांपेक्षा वादाचे धुमारे अधिक उडू लागले आहेत.


नुकताच कलर्स मराठी वाहिनीच्या अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवर बिग बॉस मराठीचा आगामी प्रोमो समोर आला आहे.या  प्रोमोमध्ये रुचिता आणि अनुश्री एकमेकींसमोर उभ्या ठाकल्या असून त्यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं आहे. घरातील इतर सदस्य मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असले, तरी या दोघींचा पारा मात्र कमी होताना दिसत नाहीये.

दरम्यान, या प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय की, रुचिता अनुश्रीसोबत वाद घालताना म्हणते, "मला जेव्हा जे बोलायचं आहे, ते मी बोलणार.  त्यावर उत्तर देत अनुश्री तिला म्हणते, "अगं, प्रत्येक वेळी अशी तलवार काढून खेळायची गरज नसते. यावेळी अनुश्री रुचिताला टास्क समजावण्याचा प्रयत्न करते. पण,रुचिता काही ऐकून घ्यायला तयार नाही. हा वाद पुढे आणखीच चिघळतो, रुचिता थेट अनुश्रीवर संतापून तिला बोलते, अगं ए फुसके हे तुझे टॅक्टिक्स आता घराबाहेर चालव. आता  रुचिता काही ऐकून घेण्याच्या परिस्थितीत नाही हे समजल्यावर अखेर अनुश्री तिला तिच्याच भाषेत सांगते, " बावळट, बिनडोक ... आणि हा वाद सुरूच राहिला ... ", आता हा वाद नेमका कशामुळे पेटला हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

सध्या सोशल मीडियावर हा प्रोमो तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी हा प्रोमो पाहून भरभरून लाईक्स आणि कमेट्सचा वर्षाव केला आहे. " टोळीची फुटली...", तसेच 
अरे बापरे हे काय झाले रुचिता आणि अनुश्री मध्ये...म्हणत हास्याचे इमोजी देत नेटकऱ्यांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.  

Web Title : बिग बॉस मराठी: क्या रूचिता और अनुश्री के बीच हुई लड़ाई से ग्रुप में दरार?

Web Summary : बिग बॉस मराठी में रूचिता और अनुश्री के बीच जबरदस्त झगड़ा हुआ। दूसरों के मध्यस्थता करने के बावजूद उनकी गरमागरम बहस बढ़ती गई। प्रोमो में आरोप-प्रत्यारोप और तीखे शब्द दिखाई दे रहे हैं, जिससे दर्शक संघर्ष का कारण जानने के लिए उत्सुक हैं।

Web Title : Bigg Boss Marathi: Ruchita and Anushree's fight escalates; group split?

Web Summary : Bigg Boss Marathi witnesses a major fallout between Ruchita and Anushree. Their heated argument escalates despite others' attempts to mediate. The promo reveals accusations and strong words, leaving viewers eager to know the cause of the conflict.