सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता ठरल्यानंतर रितेशची खास पोस्ट, अभिजीत सावंत कमेंट करत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 21:48 IST2024-10-06T21:47:05+5:302024-10-06T21:48:05+5:30
Bigg Boss Marathi 5 Winner : सूरजला विजेता घोषित करताच रितेशने स्टेजवरच त्याच्याबरोबर सेल्फी घेतला. बिग बॉस मराठीचं विजेतेपद जिंकल्यानंतर रितेशने सूरजसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता ठरल्यानंतर रितेशची खास पोस्ट, अभिजीत सावंत कमेंट करत म्हणाला...
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचं यंदाचं पर्व खऱ्या अर्थाने खास होतं. होस्ट बदलण्यापासून ते स्पर्धकांपर्यंत खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना सरप्राइजेस मिळाले. आज बिग बॉस मराठी ५ चा ग्रँड फिनाले पार पडला. सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण हा यंदाच्या पर्वाचा विजेता ठरला आहे. बुक्कीत टेंगूळ देत सूरजने झापुक झुपूक स्टाइलने बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. सूरजने ट्रॉफी जिंकताच बिग बॉस मराठीचं होस्टिंग करणाऱ्या रितेश देशमुखने खास पोस्ट शेअर केली आहे.
सूरजला विजेता घोषित करताच रितेशने स्टेजवरच त्याच्याबरोबर सेल्फी घेतला. बिग बॉस मराठीचं विजेतेपद जिंकल्यानंतर रितेशने सूरजसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. रितेशने बिग बॉस मराठीच्या मंचावरील अभिजीत आणि सूरजबरोबरचा सेल्फी त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने "बिग बॉस मराठी विनर सूरज चव्हाण तर रनर अप अभिजीत सावंत" असं कॅप्शन दिलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तर अभिजीत सावंतने इमोजी कमेंट केली आहे.
बिग बॉस मराठीचं विजेतेपद पटकावलेल्या सूरजला 'बिग बॉस मराठी ५'चा लोगो असलेला डोळा आणि पाठीमागे यंदाची थीम असलेलं चक्रव्यूह अशी यंदाच्या पर्वाची ट्रॉफी मिळाली आहे. या ट्रॉफीबरोबरच विजेत्याला १४.६० लाख रुपये मिळाले आहेत. तर इलेक्ट्रिक स्कूटरही सूरजला मिळाली आहे.
अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार आणि निक्की तांबोळी हे सदस्य बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फायनलिस्ट होतं. सूरजने ट्रॉफी जिंकत चाहत्यांना सुखद धक्का दिला. तर इंडियन आयडॉलनंतर रिएलिटी शोचा विजेता होण्याचं अभिजीत सावंतचं स्वप्न मात्र थोडक्यात हुकलं. अभिजीत बिग बॉस मराठी ५ चा उपविजेता ठरल्याने त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे.