Bigg Boss Marathi 5 :"तुझ्यापेक्षा गद्दार या घरात कोणीच नाही"; निक्की वैभववर संतापली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 19:13 IST2024-09-02T19:12:54+5:302024-09-02T19:13:57+5:30
Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या 'लयभारी' सीझनची सध्या सर्वत्र चर्चा आहे. गेला महिनाभर सदस्यांनी 'बिग बॉस मराठी'च्या घरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सर्वच टास्क, सदस्यांचे कमाल गेम प्लॅन चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

Bigg Boss Marathi 5 :"तुझ्यापेक्षा गद्दार या घरात कोणीच नाही"; निक्की वैभववर संतापली
'बिग बॉस मराठी'(Bigg Boss Marathi Season 5)च्या 'लयभारी' सीझनची सध्या सर्वत्र चर्चा आहे. गेला महिनाभर सदस्यांनी 'बिग बॉस मराठी'च्या घरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सर्वच टास्क, सदस्यांचे कमाल गेम प्लॅन चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. घरातील सदस्यांचा हा आठवडा कसा असणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात आज सहाव्या आठवड्यात नॉमिनेशन टास्क पार पडणार आहे. या टास्कमध्ये कोणता सदस्य कोणाला नॉमिनेट करणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. नॉमिनेशन टास्कदरम्यान निक्की वैभववर शब्दांचे वार करताना दिसणार आहे.
'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये वैभव निक्कीला नॉमिनेट करताना दिसत आहे. त्यामुळे निक्की वैभवला म्हणतेय,"तुझ्यापेक्षा या घरात गद्दार कोणीच नाही". त्यावर वैभव म्हणतो,"तुझ्यासाठी इथे मी गद्दारच आहे. तुझ्यासोबत अशी गद्दारी दाखवणारे की बघ. तू थेट कचरापेटीत जाऊन बस. तुझा बोलण्याचा काही संबंध नाही". निक्कीसोबत वाद घातल्यानंतर वैभव तिलाच नॉमिनेट करतो.
बाहेर आम्ही बावळट दिसतोय- छोटा पुढारी
आज पॅडी दादा आणि छोटा पुढारी अरबाजबद्दल गप्पा मारताना दिसणार आहेत. अरबाजचा सगळा गेम पलटला आहे. त्यामुळे पॅडीला छोटा पुढारी म्हणतोय,"मी अरबाजला बोललो आहे की बाहेर आम्ही बावळट दिसतोय. आपल्यासमोर एक वागतोय आणि निक्कीसमोर वेगळा वागतोय. तोंडावरचा राग स्पष्टपणे त्याने सांगावा".