Bigg Boss Marathi 5 : "निक्की इमोशनल आहे...", टीम A मधल्या सदस्यांनी मांडले मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 18:06 IST2024-09-11T18:06:25+5:302024-09-11T18:06:48+5:30
Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी'च्या मागील भाऊच्या धक्क्यावर निक्कीला पूर्ण आठवड्याची भांडी घासायची ही शिक्षा रितेश भाऊंनी दिली होती. तिची घरातली वागणूक पाहून घरामधील इतर सदस्यांना देखील तिची ही शिक्षा बरोबर वाटत होती.

Bigg Boss Marathi 5 : "निक्की इमोशनल आहे...", टीम A मधल्या सदस्यांनी मांडले मत
'बिग बॉस मराठी'च्या मागील भाऊच्या धक्क्यावर निक्कीला पूर्ण आठवड्याची भांडी घासायची ही शिक्षा रितेश भाऊंनी दिली होती. तिची घरातली वागणूक पाहून घरामधील इतर सदस्यांना देखील तिची ही शिक्षा बरोबर वाटत होती. आजच्या अनसीन अनदेखामध्ये तुम्ही पाहू शकता की, घरातले टीम 'A' मधील अभिजित , पॅडी , सूरज , अंकिता आणि आर्या हे सगळे जण गार्डन एरियात बसून निक्की विषयी बोलताना दिसत आहेत.
पॅडी म्हणाला की," निक्की दाखवते की तिला काही नाही वाटले पण ती थोडी मनाने हलली आहे. तिचे बोलणे पण वेगळे वाटते. त्यावर अभिजित म्हणाला , " काल मी बसून गाणे गायले ना. तेव्हा ती रडली आणि परत आतमध्ये जाऊन देखील ती रडली. ती खूप इमोशनल आहे. सुरज म्हणाला की ," ती तुझी मैत्रीण आहे. ती तुझ्याकडे आणि अरबाज कडेच बोलायला जाते.
सुरज म्हणाला, भावा घायाळ होऊ नकोस .
त्यावर अभिजित म्हणाला ," निक्की काम चांगले करते पण सगळे बेसिंग वगैरे स्वच्छ ठेवते. त्यावर अंकिता अभिजितला म्हणाली ,"तू तिने केलेले काम चेक करायला पण जातोस? अभिजीतचे एक आहे. तो निक्की वरती काही बोलला तर लगेच माझ्याकडे बघतो. जर मला पेन आणि पेपर दिला ना तर मी खूप काही लिहून ठेवले असते. जसे की, तू या वेळी या दिवशी हे वाक्य तू निक्कीला बोललास. त्यावर अभिजित म्हणाला,"अंकिता रेडी असते माझ्याबद्दल सगळे नोट करायला. ती गाईड घेऊन बसते आणि सगळे लिहून ठेवते .यावर सुरज म्हणाला,"भावा घायाळ होऊ नकोस . नाही तर वहिनी शेरनी आली ना कारण बिग बॉसने लिहिले आहे. मी येतोय पण शेर सोबत शेरनी पण येऊ शकते."