"देवाने तुझ्यासारखा परफेक्ट...", बिग बॉस फेम अंकिता वालावलकरची होणाऱ्या नवऱ्यासाठी रोमॅन्टिक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 11:15 IST2025-01-02T11:06:08+5:302025-01-02T11:15:43+5:30
अंकिता वालावलकरच्या नव्या पोस्टने वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले...

"देवाने तुझ्यासारखा परफेक्ट...", बिग बॉस फेम अंकिता वालावलकरची होणाऱ्या नवऱ्यासाठी रोमॅन्टिक पोस्ट
Ankita Walawalkar : कलाकार मंडळींबरोबर सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर देखील सातत्याने चर्चेत येत असतात. आपल्या वैयक्तिक आयुष्यासोबतच अनेक अपडेट्स ते चाहत्यांना सोशल मीडिया मार्फत देत असतात. त्यामधील एक नाव म्हणजे 'बिग बॉस मराठी' फेम कोकणकन्या अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar). 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वामुळे अंकिता चांगलीच प्रसिद्धीझोतात आली. या शोनंतर तिच्या लोकप्रियतेत सुद्धा कमालीची वाढ झाली. आता लवकर 'कोकण हार्टेड गर्ल' संगीत दिग्दर्शक कुणाल भगतसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे तिचे चाहतेदेखील उत्सुक असल्याचे पाहायला मिळतायत. अगदी काल नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अंकिता वालावलकरने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अंकिता वालावलकरने तिचा होणाऱ्या नवऱ्यासोबतचे रोमॅन्टिक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये अंकिता कुणालचं कौतुक करत व्यक्त झाली आहे. सोशल मीडियावर अंकिताने कुणाल आणि तिचे फोटो शेअर करून त्याला भलंमोठं कॅप्शन देत लिहिलंय की, "देवाने माझ्याकडे पाहिलं आणि त्याने तुझ्यासारख्या परफेक्ट व्यक्तीला माझ्या आयुष्यात पाठवलं."
पुढे अंकिताने लिहिलंय, "आयुष्यात प्रेम आणि शांतता लाभावी याकरिता मी देवाकडे कायमच प्रार्थना केली. या माणसाच्या येण्याने त्या सगळ्या गोष्टी साध्य झाल्या. नववर्ष २०२५ माझ्या जीवाभावाच्या माणसांसोबत..." अंकिता-कुणालचे सोशल मीडियावरील फोटो पाहून नेटकरी सुद्धा खुश झाले आहे. त्यांच्या फोटोंवर प्रतिक्रिया देत या दोघांवर त्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.
अंकिता-कुणाल लवकरच करणार लग्न
अंकिता वालावलकरने बिग बॉसमध्ये असताना तिने तिच्या बॉयफ्रेंडबद्दल खुलासा केला होता. पण बॉयफ्रेंड कोण हे सांगितलं नव्हतं. शेवटी बिग बॉसमधून बाहेर आल्यावर अंकिताने तिच्या बॉयफ्रेंडचा खुलासा केला. कुणाल भगत असं अंकिताच्या बॉयफ्रेंडचं असून तो एक गायक-संगीतकार आहे. अंकिता - कुणाल जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारी २०२५ मध्ये लग्न करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.