Video: अखेर घनःश्यामला कंठ फुटला, बिग बॉसच्या घरात जान्हवीविरोधात दंड थोपटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 14:03 IST2024-09-03T14:03:16+5:302024-09-03T14:03:43+5:30
घनःश्याम दरवडे अर्थात छोटा पुढारीने जान्हवीसोबत जोरदार भांडण केलं आहे. काय घडलंय नेमकं घरात बघा (bigg boss marathi 5)

Video: अखेर घनःश्यामला कंठ फुटला, बिग बॉसच्या घरात जान्हवीविरोधात दंड थोपटला
'बिग बॉस मराठी'चा नव्या सीझनमध्ये काल सहाव्या आठवड्याची नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली. गेल्या अनेक दिवसांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. गेल्या आठवड्यात अरबाजचं रौद्र रुप पाहायला मिळालं होतं. तर निक्कीची सुद्धा भांडणं बघायला मिळाली. यंदाच्या या कठीण आठवड्यात प्रेक्षकांना अनेक नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. अशातच या आठवड्यात छोटा पुढारी आणि जान्हवी किल्लेकर यांच्यात वाद बघायला मिळणार आहे.
जान्हवीने काढली घनःश्यामची अक्कल
'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागाच्या प्रोमोमध्ये जान्हवी घन:श्यामसोबत वाद घालत म्हणत आहे,"सगळ्यांना माहिती आहे तुला अक्कल नाही. अख्या घराने तुला नॉमिनेट केलं आहे. त्यावर घन:श्याम म्हणतो,"मला फरक पडत नाही. तू जेलमध्ये राहून आली आहेस. तुला अक्कल नाही". पुढे घन:श्यामला फटकारत जान्हवी म्हणते,"अक्कल शून्य आहेस तू". अशाप्रकारे जान्हवी आणि घनःश्याममध्ये मोठा वाद झाला.
या आठवड्यात 'हे' सदस्य झालेत नॉमिनेट
'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये एकूण ७ जण नॉमिनेट झाले आहेत. घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, अरबाज पटेल हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या सदस्यांपैकी कोण आपला गेम प्लॅन अधिक चांगला आखणार? कोण सेफ होणार आणि कोण अनसेफ होणार? याकडे 'बिग बॉस' प्रेमींचं लक्ष लागलं आहे.