मेहनतीचं फळ! 'बिग बॉस' फेम अभिनेता 'या' ठिकाणी बांधतोय ड्रीम होम, दाखवली घराची पहिली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 09:20 IST2025-05-12T09:17:19+5:302025-05-12T09:20:08+5:30

क्या बात है! 'बिग बॉस' फेम अभिनेत्याची लवकरच होणार स्वप्नपू्र्ती, 'या' ठिकाणी बांधतोय ड्रीम होम 

bigg boss marathi 5 fame actor vaibhav chavan build new farmhouse in hometown shared post | मेहनतीचं फळ! 'बिग बॉस' फेम अभिनेता 'या' ठिकाणी बांधतोय ड्रीम होम, दाखवली घराची पहिली झलक

मेहनतीचं फळ! 'बिग बॉस' फेम अभिनेता 'या' ठिकाणी बांधतोय ड्रीम होम, दाखवली घराची पहिली झलक

Vaibhav Chavan: 'बिग बॉस मराठी'चं पाचवं पर्व खूप गाजलं. या पर्वात  कलाकारांसोबत सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर देखील  सहभागी झाले होते. त्यामुळे या पर्वाची सगळीकडे चर्चा होती. दरम्यान, या शोमध्ये असताना हे स्पर्धक चर्चेत होते, तितकीच त्यांची चर्चा आता देखील होते. या स्पर्धेत बारामतीचा पठ्ठ्या म्हणजेच वैभव चव्हाण (Vaibhav Chavan) देखील पाहायला मिळाला. मूळचा बारामतीचा असलेला वैभव त्याच्या पिळदार शरीरयष्टीसाठी ओळखला जातो.अशातच लवकरच वैभवचं स्वप्न साकार होणार आहे. आपल्या गावाकडे हा अभिनेता टुमदार फार्महाऊस बांधत आहे. 


नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट करत वैभव चव्हाणने त्याच्या फार्महाऊसची खास झलक चाहत्यांना दाखवली आहे. "फार्महाऊस तयार होत आहे...",असं कॅप्शन देत त्याने काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. वैभव गावी असलेल्या शेतात एक मोठं, ऐसपैस घर बांधत आहे. या घराच्या भिंती पूर्ण तयार झाल्या असून अजून बरंच काम शिल्लक आहे. तसंच येत्या काही दिवसात त्याचं हे फार्महाऊस दिमाखात उभं राहिलेलं पाहायला मिळेल. दरम्यान, वैभवच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

वर्कफ्रंट 

वैभव चव्हाणच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर झी मराठीच्या 'मन झालं बाजिंद' या मालिकेत तो मुख्य भूमिकेत झळकला. त्यानंतर बिग बॉसच्या शो मध्ये सहभागी झाला होता. या कार्यक्रमाने त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळवून दिली. 

Web Title: bigg boss marathi 5 fame actor vaibhav chavan build new farmhouse in hometown shared post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.