'कमळी' मालिकेची तारीख अन् वेळ ठरली! 'बिग बॉस' फेम अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 12:56 IST2025-06-19T12:53:27+5:302025-06-19T12:56:18+5:30

'कमळी' मालिकेत 'बिग बॉस' फेम अभिनेता साकारणार मुख्य भूमिका, प्रोमो चर्चेत 

bigg boss marathi 5 fame actor nikhil damle to play lead role in kamali serial promo viral  | 'कमळी' मालिकेची तारीख अन् वेळ ठरली! 'बिग बॉस' फेम अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

'कमळी' मालिकेची तारीख अन् वेळ ठरली! 'बिग बॉस' फेम अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

Kamali Serial: सध्या छोट्या पडद्यावर नवनवीन विषयांवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशातच मराठी मालिकाविश्वात झी मराठी वाहिनीवरील आगामी 'कमळी' या मालिकेची सर्वत्र चर्चा आहे. दरम्यान, कमळी मध्ये अभिनेत्री विजया बाबर मुख्य भूमिकेत असणार आहे. परंतु अन्य स्टारकास्टबद्दलची माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली होती. त्यावरुन आता पडदा हटविण्यात आला आहे. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता आणि स्टारकास्ट समोर आली आहे. 

अलिकडेच काही दिवसांपूर्वी कमळीचा धमाकेदार प्रोमो शेअर करण्यात आला होता. त्यामुळे मालिका रसिकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. 
त्यात आता मालिकेचा आगामी प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉस मराठी फेम अभिनेता निखिल दामलेची झलक पाहायला मिळत आहे. निखिल या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय प्रोमोमध्ये विजया बाबसरह, निखिल दामले, केतरी कुलकर्णी, योगिनी चौक, इला भाटे, आशा शेलार, अनिकेत केळकर, सुषमा मुरुडकर अशा तगड्या कलाकारांची फौज झळकणार आहे. 

दरम्यान, कमळी मालिका येत्या ३० जूनपासून रोज रात्री ९.०० वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे. 

Web Title: bigg boss marathi 5 fame actor nikhil damle to play lead role in kamali serial promo viral 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.