'बिग बॉस मराठी'च्या घरात जिनिलीयाने पाठवले उकडीचे मोदक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 10:23 IST2024-09-10T10:23:32+5:302024-09-10T10:23:58+5:30
Bigg Boss Marathi : संपुर्ण राज्यात गणेशोत्सव दणक्यात साजरा होत आहे. मग यात ' बिग बॉस मराठी'चे घर कसे ...

'बिग बॉस मराठी'च्या घरात जिनिलीयाने पाठवले उकडीचे मोदक!
Bigg Boss Marathi : संपुर्ण राज्यात गणेशोत्सव दणक्यात साजरा होत आहे. मग यात 'बिग बॉस मराठी'चे घर कसे मागे राहिलं. नुकतंच पार पडलेल्या 'बिग बॉस मराठी'च्या भाऊचा धक्कावर गणेशोत्सव साजरा करण्यात आला. 'बिग बॉस मराठी'चा होस्ट असलेल्या रितेशची पत्नी आणि महाराष्ट्राची लाडकी वहिणी जिनिलिया देशमुखने संपुर्ण सदस्यांसाठी मोदक पाठवले होते.
'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या आठवड्यातील भाऊच्या धक्क्यावर यंदा 'गणेशोत्सव विशेष' पाहायला मिळाला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने यंदा भाऊच्या धक्क्यावर संदीप पाठक, उत्कर्ष शिंदे अशा अनेक खास पाहुण्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी सदस्यांना जिनिलिया देशमुखने पाठवलेले मोदक संपुर्ण सदस्यांना देण्यात आले. खास मोदक पाठवल्याबद्दल सर्व सदस्यांनी जिनिलिया देशमुखचे आभार मानले.
यावेळी सुरजनं बाप्पाच्या फोटोसमोर मोदक ठेवला आणि डोकं टेकून पायाहीही पडला. सूरजच्या या कृतीनं सर्व प्रेक्षकांनी कौतुक केलं. त्याचा साधेपणा पुन्हा एकदा प्रेक्षकांना भावला. याआधी “गणपती बाप्पाच्या कृपेने मी कॅप्टन झालो” असं सूरज म्हणाला होता. आता मोदकाचा प्रसाद सर्वात आधी बाप्पाला अर्पण केल्याने सूरजने पुन्हा एकदा सर्वांचं मन जिंकून घेतलं आहे. दरम्यान, आठवड्यात एकूण ७ सदस्य नॉमिनेट होते. यापैकी घन:श्याम दरवडेने म्हणजेच छोट्या पुढारीने घराचा निरोप घेतला. तर संग्राम चौघुले याची घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे.