Bigg Boss Marathi 4 : आई कुठे काय करते फेम संजना पुन्हा दिसणार बिग बॉस मराठीमध्ये?, केली मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 18:26 IST2022-09-10T14:12:09+5:302022-09-10T18:26:04+5:30
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉस मराठीचा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात आई कुठे काय करते मालिकेतील संजना दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Bigg Boss Marathi 4 : आई कुठे काय करते फेम संजना पुन्हा दिसणार बिग बॉस मराठीमध्ये?, केली मोठी घोषणा
'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) ही मालिका लोकप्रियतेमध्ये आणि टीआरपीमध्ये प्रथम स्थानावर आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये तिची कायम चर्चा रंगत असते. या मालिकेच्या कथानकासह त्यातील कलाकारांनीही प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. यात निगेटिव्ह भूमिकेत असलेल्या संजनाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. नकारात्मक भूमिका असतानाही ती उत्तमरित्या सादर केल्यामुळे रुपालीची नेटकऱ्यांमध्ये कायमच चर्चा रंगत असते.
अभिनेत्री रुपाली भोसले सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. अनेक फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. रुपालीनं तिला 'बिग बॉस मराठी 4'मध्ये गेस्ट म्हणून यायचं आहे असं सांगितलं आहे. रुपालीला बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात पाहण्यासाठी तिचं चाहतेही उत्सुक आहेत. रुपाली याआधी 'बिग बॉस २'मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.
रुपालीनं इन्स्टाग्रमावर 'विचारा प्रश्न' हा गेम खेळला होता. त्यादरम्यान चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारलं. एका चाहत्यानं तिला 'बिग बॉस मराठी 4 मध्ये गेस्ट अपिरिअन्स करायला आवडेल का?', असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देत रुपाली भोसले 'हो' असं म्हणाली. रूपालीच्या उत्तरानंतर अनेकांनी तिला असं न करण्याचा सल्ला ही दिला आहे. कमेंट्मध्ये 'रुपाली आई कुठे काय करते मालिकेतच छान दिसतेय', असं सांगितलं.
दरम्यान छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 4)चा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोची सध्या सर्वत्र खूप चर्चा होताना दिसत आहे.यात प्राजक्ता गायकवाड, तेजश्री जाधव, शर्वरी लोहकरे आणि अभिनेता हार्दीक जोशीचं यांच्या नावांची चर्चा आहे. महेश मांजरेकर शो होस्ट करणार आहेत.