Bigg Boss Marathi 4: ऐ शेवंते...., घरात येताच राखी सावंतने घेतला अपूर्वा नेमळेकरशी पंगा, पुढे काय होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 13:07 IST2022-11-28T13:06:00+5:302022-11-28T13:07:49+5:30
Bigg Boss Marathi 4: होय, घरात एन्ट्री होताच राखीने धमाका केला. येताच तिने अपूर्वा नेमळेकरसह विकास सावंतची फिरकी घेतली...

Bigg Boss Marathi 4: ऐ शेवंते...., घरात येताच राखी सावंतने घेतला अपूर्वा नेमळेकरशी पंगा, पुढे काय होणार?
‘बिग बॉस मराठी 4’मध्ये (Bigg Boss Marathi 4) चार वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार, हे तर ठाऊक होतं. पण बिग बॉस इतका मोठा धमाका करतील, याची कुणीही कल्पना केली नव्हती. होय, काल समृद्धी घरातून बाद झाली आणि पाठोपाठ बिग बॉसने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत, चार जणांना घरात पाठवलं. यातलं एक नाव सगळ्यांसाठीच सरप्राईज होतं. हे नाव म्हणजे राखी सावंत. ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant ) घरात आली आणि स्पर्धकांसह प्रेक्षकांना देखील मोठा धक्काच बसला.
कालच्या भागात घरात एक नाही, दोन नाही तर चार जणांची चॅलेंजर्स म्हणून एन्ट्री झाली. विशाल निकम, आरोह वेलणकर, मीरा जगन्नाथ आणि राखी सावंत यांनी बिग बॉसच्या घरात दमदार एंट्री घेतली. यापैकी राखी सावंतने घरात एन्ट्री घेताच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आत्तापर्यंत राखीला आपण ‘बिग बॉस हिंदी’मध्ये पाहिलं आहे. पण राखी मराठी बिग बॉसमध्ये आली म्हटल्यावर घरात एक ना अनेक ड्रामे होणार. याची झलक पहिल्याच दिवशी पाहायला मिळाली.
होय, घरात एन्ट्री होताच राखीने धमाका केला. येताच तिने अपूर्वा नेमळेकरसह विकास सावंतची फिरकी घेतली. अगदी घरात पाऊल ठेवताच, ‘ऐ शेवंते...,’ असं म्हणत राखीने अपूर्वाला आवाज दिला आणि अपूर्वासह सगळ्यांनाच हसू आवरलं नाही.
‘तुम्हा सर्वांची आई आहे मी. मी बिग बॉसची पहिली बायको आहे. अंड्याची भुर्जी आणि राखी सावंतची मर्जी इथे चालणारच..,’असं तिने येताच जाहिर करून टाकलं. त्यामुळे राखी घरात धुमाकूळ घालणार, हे तर निश्चित झालंय. त्यामुळे इथे राखी राडा घालणार ही निश्चित. तिच्यासोबत विशाल, मीरा, आरोह काय धम्माल करतात? बिग बॉस मराठीच्या घरातला खेळ कसा बदलणार? ते बघूच.