Bigg Boss Marathi 4 : महेश मांजरेकर सगळ्या सदस्यांची घेणार शाळा, बिग बॉसच्या चावडीवर काय घडणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 19:58 IST2022-10-15T19:58:10+5:302022-10-15T19:58:46+5:30
Bigg Boss Marathi 4 : अपूर्वाशिवाय अनेक स्पर्धकांना महेश सरांनी मागच्या चावडीत चांगलेच खडेबोल लगावले होते.

Bigg Boss Marathi 4 : महेश मांजरेकर सगळ्या सदस्यांची घेणार शाळा, बिग बॉसच्या चावडीवर काय घडणार?
'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सीझनची सोशल मीडियावर चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस बिग बॉस शो मनोरंजक होत चालला आहे. शिवाय स्पर्धकांमध्येही जोरदार वाद पहायला मिळत आहे. त्यामुळे बिग बॉसची चर्चा सर्वत्र पहायला मिळत आहे. प्रेक्षक उत्सुकतेने महेश सरांच्या आठवड्याच्या चावडीची वाट पाहत असतात. या चावडीमध्ये स्पर्धकांनी आठवडाभर केलेल्या चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींची शाळा घेतल्याचे पहायला मिळते. बिग बॉसच्या पहिल्या आठवड्यात समृद्धी घराची कॅप्टन झाली होती. तर या आठवड्यात रोहित शिंदे घराचा दुसरा कॅप्टन झाला आहे. दरम्यान आता दुसऱ्या चावडीचा प्रोमो समोर आला आहे.
कलर्स मराठीच्या इन्स्टाग्रामवर चावडीचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत पाहायला मिळतंय की महेश सर आठवड्याभरात झालेल्या सगळ्या गोष्टीवर स्पर्धकांना वठणीवर आणण्याचं काम करणार आहे. त्यामुळे या चावडीत महेश सरांच्या तावडीत कोण कोण स्पर्धक सापडणार हे पाहणं कमालीचं ठरणार आहे.
मागील आठवड्याच्या चावडीवर महेश मांजरेकरांनी अपूर्वाची चांगलीच शाळा घेतली. तरीही या आठ्वड्यात सुद्धा तिचा आवाज काही कमी झालेला नाही. या आठ्वड्यात देखील तिने किरण माने,विकास सावंत यांच्यावर आवाज चढवला. त्यामुळे महेश सर यावर काय शाळा करणार हे पाहणेही औत्सुकतेचं ठरणार आहे. अपूर्वाशिवाय अनेक स्पर्धकांना महेश सरांनी मागच्या चावडीत चांगलेच खडेबोल लगावले होते.