Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठी ४ सुरू होण्यासाठी उरलाय थोडाच अवधी, कधी आणि कुठे पाहता येणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 18:15 IST2022-10-02T18:14:16+5:302022-10-02T18:15:29+5:30
Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठी ४ची थीम ऑल इज वेलवर आधारित आहे. या सीझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत आणि आता हा सीझन सुरू होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत.

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठी ४ सुरू होण्यासाठी उरलाय थोडाच अवधी, कधी आणि कुठे पाहता येणार?
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस. हिंदीत हा शो हिट झाल्यानंतर काही वर्षांपूर्वी हा शो मराठीतही सुरू झाला. प्रेक्षकांमध्ये लोकप्रियही ठरला. आता बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 4 )चा चौथा सीझन भेटीला येणार आहे. यंदाच्या सीझनचं सूत्रसंचालन दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर करणार आहेत. यंदाच्या सीझनची थीम ऑल इज वेलवर आधारित आहे. या सीझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत आणि आता हा सीझन सुरू होण्यासाठी अवघा काही वेळ उरली आहे.
बिग बॉस मराठी ४चा प्रीमियर आजपासून म्हणजेच २ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. बिग बॉस मराठी ४ चा प्रीमयर आज संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणार आहे. त्यानंतर आता पुढचे १०० दिवस हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. बिग बॉस मराठी ४ सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे. तर वीकेंडला शनिवार आणि रविवारी ९.३० वाजता प्रसारित केला जाणार आहे. ज्यात महेश मांजरेकर आपल्या अनोख्या स्टाइलमध्ये स्पर्धकांची शाळा घेताना दिसणार आहेत. याशिवाय हा शो तुम्हाला वूट या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पाहता येणार आहे.
ऑल इज वेल थीमवर आधारित असलेल्या या सीझनमध्ये कोणकोणते कलाकार दिसणार याबाबत कोणताही खुलासा अद्याप झालेला नाही. पण सोशल मीडियावर अपूर्वा नेमळेकर, नेहा खान, समीर परांजपे, किरण माने, सायली संजीव, हार्दिक जोशी या कलाकारांच्या नावाची चर्चा आहे.