Bigg Boss Marathi 4, Day 9 : बिग बॉस मराठीच्या घरचं स्वच्छता अभियान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 17:27 IST2022-10-11T17:27:00+5:302022-10-11T17:27:40+5:30
Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये यशश्री, अपूर्वा आणि मेघा ताईमध्ये सुरु आहे स्वच्छता आणि घर कामावरून चर्चा.

Bigg Boss Marathi 4, Day 9 : बिग बॉस मराठीच्या घरचं स्वच्छता अभियान!
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 4)चे चौथे पर्व नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. यंदाच्या सीझनमध्ये प्रसाद जवादे, अमृता धोंडगे, निखिल राजशिर्के, किरण माने, समृद्धी जाधव, अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, योगेश जाधव, अमृता देशमुख, यशस्वी मसुरेकर यांच्यासह इतर कलाकार सहभागी झाले आहेत. आज या सदस्यांचा घरातील सातवा दिवस आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये भांडणासोबतच मजामस्ती देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान आज घरामध्ये यशश्री, अपूर्वा आणि मेघा यांच्यामध्ये स्वच्छता आणि घर कामावरून चर्चा ऐकायला मिळणार आहे.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये यशश्री, अपूर्वा आणि मेघा ताईमध्ये सुरु आहे स्वच्छता आणि घर कामावरून चर्चा. यशश्री या चर्चेत कोणा एका सदस्यावर खूपच वैतागली असून तिचे म्हणणे आहे, "एकंच गोष्ट कितीवेळा सांगायची हि काही शाळा आहे का? मग तसं सांगा मी शाळा उघडते. ओला कचरा, सुका कचरा दोन डब्बे आहेत हे लक्षात ठेवायला किती त्रास होतो ? मेघा ताईचे पण म्हणणं पडलं, एकाच दिवसांत त्याने इतक्या वेळा विचारलं...
यशश्रीचे म्हणणे आहे, "ते जाऊदे चमचे दररोज ठेवायची जागा माहिती आहे ना हे कुठे ठेऊ हे कुठे ठेऊ ? माहिती आहे ना जागा मग ? तुझ्याबरोबर बसू का तिकडे शिकवायला ? जर गोष्टी चुकायच्या आहेत तर आपण बोलणार ना ? त्याला आत्मविश्वासच नाहीये". आणि ही चर्चा सुरूच राहिली ... बघुया या तिघी कोणाबद्दल बोलत आहेत ते आजच्या भागामध्ये. बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर पाहायला मिळेल.