Bigg Boss Marathi 4, Day 19 : बिग बॉसच्या घरात योगेशचा राग झाला अनावर आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 13:29 IST2022-10-21T13:28:53+5:302022-10-21T13:29:12+5:30
Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस यांनी सदस्यांवर वाजवा रे वाजवा कॅप्टन्सी कार्य सोपवले. कार्या दरम्यान शाब्दिक चकमक, वादावादी, भांडणं, मारामारी हे आपण बघत आलो आहोत.

Bigg Boss Marathi 4, Day 19 : बिग बॉसच्या घरात योगेशचा राग झाला अनावर आणि...
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉस मराठीचा यंदा चौथा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉसच्या घरात सदस्यांना दाखल होऊन १८ दिवस उलटले आहेत. आता हा शो रंजक वळणावर आला आहे. घराघरात दररोज नवीन वाद, भांडणं, मैत्री आणि रुसवे फुगवे पाहायला मिळतात. दरम्यान बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस यांनी सदस्यांवर वाजवा रे वाजवा कॅप्टन्सी कार्य सोपवले. कार्या दरम्यान शाब्दिक चकमक, वादावादी, भांडणं, मारामारी हे आपण बघत आलो आहोत.
सदस्यांना बऱ्याचदा त्यांच्या रागावर नियंत्रण राहत नाही आणि ते असे काही करून बसतात की नंतर त्यांना त्या गोष्टीचे वाईट वाटते. असंच काहीसं आज घरामध्ये होणार आहे. इतर सदस्यांशी वाद घालताना योगेशचा राग अनावर झाला आणि... मेघाताई आणि योगेशमध्ये कार्या दरम्यान वादावादी झाली. मेघा ताई म्हणाल्या, "अरे तुझं डोकं गुडघ्यात... दोन्ही गुडघ्यात आहे ते सांभाळून ठेव मेंदू तुझा... योगेशने एक शब्द खाली पडू नाही दिला त्याने उत्तरं दिले... अपूर्वा म्हणाली, याचे जेवढे वयं नाहीये ना तितकं तिचं करिअर आहे.
सदस्यांनी योगेशला शांत करण्याचा प्रयत्न केला पण... पुढे काय झालं हे आजच्या भागामध्ये कळेल. बिग बॉस मराठी सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता आणि शनिवारी, रविवारी रात्री ९.३० वाजता पाहायला मिळेल.