Bigg Boss Marathi 4, Day 14 : तिथे कोणी मित्र नाही…, असं का म्हणताहेत किरण माने
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 16:56 IST2022-10-17T16:55:59+5:302022-10-17T16:56:34+5:30
Bigg Boss Marathi 4 : आज घरामध्ये पार पडणार आहे फटा पोश्टर निकाला झिरो हे नॉमिनेशन कार्य.

Bigg Boss Marathi 4, Day 14 : तिथे कोणी मित्र नाही…, असं का म्हणताहेत किरण माने
बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi 4)च्या घरामधून निखिल राजेशिर्केला बाहेर जावे लागले. आज घरामध्ये पार पडणार आहे “फटा पोश्टर निकाला झिरो” हे नॉमिनेशन कार्य. सदस्य या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणाला नॉमिनेट करणार ? आणि कोणाला सेफ ? कोण घराबाहेर जाईल ? हे कळेल लवकरच. मात्र याबद्दल किरण माने आणि तेजस्विनीमध्ये चर्चा होताना दिसणार आहे.
किरण माने तेजस्विनीला सांगताना दिसणार आहे, "मी विकासला सांगितलं आहे, माझ्या अटी पूर्ण झाल्या नाहीतर मी त्याला देखील नॉमिनेट करणार... तिथे मित्र नाही की कोणी नाही…तो आता माझ्यासाठी झटतो आहे. माझी एक अट आहे, योगेशने प्रसादला नॉमिनेट केलं तर मी तुला वाचवतो. आणि हे पूर्ण नाही झालं तर विकास नॉमिनेट झाला तरी मला हरकत नाही”.
तेजस्विनी तिची बाजू मांडताना म्हणताना दिसणार आहे, "माझं तुमच्याशी असं काही वैयक्तिक नाहीये. योगेशने प्रसादला नॉमिनेट करावं हे वेगळे आहे... जर तुम्ही तसं नाही तर मला विकासाला नाईलाजाने नॉमिनेट करावं लागेल”. त्यावर किरण यांचे म्हणणे आहे, "पण हीच माझी डील आहे."
आता किरण यांच्या डीलमुळे विकास नॉमिनेट होईल ? कि तेजस्विनी योगेशला सांगून प्रसादला नॉमिनेट करवेल. बघूया या सगळ्या प्रक्रियेत कोण नॉमिनेट होईल ? आणि कोण सेफ होईल ? किरण आणि विकासच्या यांच्या मैत्रीत दुरावा येईल ? हे जाणून घेण्यासाठी बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. या चर्चेनंतर आता हे कोणाला नॉमिनेट करणार हे पाहावे लागेल.