Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात बोल्डनेसचा तडका, या अभिनेत्रीच्या बिकनीतील लूकची होतेय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 18:55 IST2022-10-15T18:55:32+5:302022-10-15T18:55:59+5:30
Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या घरातील एका अभिनेत्रीचा बोल्ड अवतार सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात बोल्डनेसचा तडका, या अभिनेत्रीच्या बिकनीतील लूकची होतेय चर्चा
कलर्स मराठी या वाहिनीवर सुरू झालेल्या बिग बॉस (Bigg Boss Marathi 4)च्या चौथ्या सीझनमध्ये बरेच सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. यामध्ये अनेक अभिनेत्री देखील सहभागी झाल्याचे दिसत आहेत. यशश्री मसुरकर, समृद्धी जाधव, तेजस्विनी लोणारे, रुचिरा या अभिनेत्री सहभागी झाल्या आहेत. यामध्ये काही अभिनेत्री अतिशय बोल्ड आणि ब्यूटीफुल आहेत. आता एका अभिनेत्रीचा बोल्ड अवतार सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
सध्या यशश्री मसुरकर (Yashashree Masurkar) खूप चर्चेत आली आहे. कारण यशश्री हिने एक बोल्ड अवतार नुकताच बिग बॉसच्या घरामध्ये दाखवला आहे. बिग बॉसच्या घरामध्ये सहभागी होताना देखील तिने अतिशय ग्लॅमरस बोल्ड आणि ब्युटीफुल फोटोसेशन केले होते. यशश्री ही एक रेडिओ जॉकी देखील आहे. ती आपल्या रेडिओचे शूट एका रिक्षामध्ये जाऊनच करत असते. तिच्याकडे रिक्षा आहे. त्यामुळे तिला टुकटुक राणी असे देखील संबोधले जाते.
आता बिग बॉसच्या घरामध्ये तिने स्विमिंग पूलमध्ये बिकनीमधील आपला हॉट अवतार दाखवला आहे. यामुळे सर्वजण अवाक झाले आहेत. तिच्या या व्हिडीओची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा देखील होत आहे. तर अनेकांनी तिला ट्रोल करून टीका देखील केली आहे. एका मराठी अभिनेत्रीला किंवा सेलिब्रिटीला अशा प्रकारे वागणे हे शोभत नाही, असेही अनेकांनी म्हटले आहे.