Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस’च्या घरात अमृता फडणवीस यांची एन्ट्री, ‘कजरा रे’ गाण्यावर धरला ठेका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 10:53 IST2022-10-26T10:50:21+5:302022-10-26T10:53:33+5:30

Bigg Boss Marathi 4 daily Updates: ‘बिग बॉस’च्या घरात पहिलं पाऊल टाकताच अमृता फडणवीस यांनी वाकून तुळशी वृंदावनाला नमस्कार केला....

bigg boss marathi 4 bbm4 updates amruta fadnavis enters house | Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस’च्या घरात अमृता फडणवीस यांची एन्ट्री, ‘कजरा रे’ गाण्यावर धरला ठेका

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस’च्या घरात अमृता फडणवीस यांची एन्ट्री, ‘कजरा रे’ गाण्यावर धरला ठेका

बिग बॉस मराठी’चा चौथा सीझन (Bigg Boss Marathi 4) सध्या चांगलाच गाजतोय. रोज नवे राडे, रोज नवी भांडण, मैत्री, प्रेम, रूसवे-फुगवे असं सगळं घरात पाहायला मिळतंय. अशात काही सरप्राईज एलिमेंटही आहेत. आजच्या एपिसोडमध्ये ‘बिग बॉस मराठी 4’मध्ये मिसेस उपमुख्यमंत्री अर्थात अमृता फडणवीस एन्ट्री करणार आहेत. वाचून आश्चर्याचा धक्का बसला ना? पण हे खरं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अमृता फडणवीस यांची एन्ट्री होणार आहे.
 अभिनेत्री मेघा घाडगे ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर पडली आहे. गेल्या रविवारी मेघा घरातून बाद झाली.  मंगळवारी एपिसोडच्या सुरुवातीला ‘बिग बॉस मराठी’च्या घरात दोन अनपेक्षित पाहुणे आलेले दिसले. ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा दरवाजा उघडताच आता वाईल्ड कार्ड एण्ट्री होणार, असं वाटत असताना  ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेतील कावेरी (तन्वी मुंडले) आणि राजवर्धन (विवेक सांगळे) यांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली. त्यांनी स्पर्धकांना साप्ताहिक कार्य सोपवले. त्यातील पहिल्या उपकार्यात अपूर्वा नेमळेकर-अमृता देशमुख यांच्या टीमने बाजी मारली.

आता आज बुधवारच्या एपिसोडमध्ये स्पर्धकांना आणि ‘बिग बॉस मराठी’च्या चाहत्यांना आणखी एक सरप्राईज मिळणार आहे. होय, आजच्या एपिसोडमध्ये अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री घेणार आहेत.
  मंगळवारच्या एपिसोडच्या शेवटी  उद्याच्या भागाच्या ‘कमिंग अप’मध्ये अमृता फडणवीस यांची झलक दिसली.  स्वागत करुया बँकर, समाजसेविका आणि गायिका अमृता फडणवीस यांचं... अशी घोषणा बिग बॉसने आपल्या दमदार आवाजात केली आणि नमस्कार, हाय... म्हणत अमृता फडणवीस यांनी धमाकेदार एन्ट्री घेतली. घरात पहिलं पाऊल टाकताच  अमृता फडणवीस यांनी वाकून तुळशी वृंदावनाला नमस्कार केला.

त्यांच्यासमोर साप्ताहिक कार्य तर रंगलेच पण, किरण माने आणि यशश्री यांनी अमृता जींना काही प्रश्न देखील विचारले. देवेंद्रजींचा फराळातला आवडता पदार्थ कुठला ? असा प्रश्न यशश्रीने विचारला. यावर,   त्यांना पोहेतरी खूप आवडते. त्यांना मोदक आवडतात, करंजी आवडते, असं अमृता म्हणाल्या. किरण माने यांनी जरा राजकीय प्रश्न विचारला. तुम्हांला माहितीच असेल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टनपद खूप महत्वाच असतं. पण मला तुम्हांला विचारायचं आहे की, बिग बॉसच्या बाहेर महाराष्ट्र आहे त्याचा कॅप्टन कोण आहे ? असा प्रश्न मानेंनी केला. यावर अमृताजी म्हणाल्या, मी तुम्हांला दोन नावं सांगते जे महाराष्ट्राचे कॅप्टन आहेत एक प्रॅक्टिकल आणि एक इमोशनल कॅप्टन. श्री. एकनाथ राव शिंदेजी एक कॅप्टन आहेत आणि एक देवेंद्र फडणवीसजी आहेत.

यावेळी अमृता ‘कजरा रे कजरा रे’ गाण्यावर थिरकतानाही दिसल्या. अमृता फडणवीस यांचा घरात रोल काय असणार, हे अद्याप समजलेलं नाही. त्या स्पर्धकांना एखादा टास्क देणार असल्याची चर्चा रंगली आहे. परंतु आजच्या एपिसोडमध्ये काय होणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

Web Title: bigg boss marathi 4 bbm4 updates amruta fadnavis enters house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.