Bigg Boss Marathi 4 : घरात टीम Bमध्ये फूट, तेजस्विनी विचारणार प्रसादला जाब !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 13:58 IST2022-11-15T13:53:26+5:302022-11-15T13:58:10+5:30
Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये टीम B मध्ये एकमेकांतच भांडणं असल्याचे दिसून येतंय.

Bigg Boss Marathi 4 : घरात टीम Bमध्ये फूट, तेजस्विनी विचारणार प्रसादला जाब !
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये टीम B मध्ये एकमेकांतच भांडणं असल्याचे दिसून येते. किरण माने आणि प्रसादचे अजिबात पटत नाही हे आपल्या सगळ्यांनाच आता कळून चुकले आहे. आज तेजस्विनी प्रसादला जाब विचारताना दिसणार आहे.
तेजस्विनीचे म्हणणे आहे, आमच्या विरुध्द्व असताना कसे तू मांडतोस व्यवस्थित मुद्दे ? कन्फ्यूजनची पुडी जर एक माणसाने दिली असेल ना ती कॅरीफॉरवर्ड ज्या लोकांनी केली ना तू आज त्यांच्याशीच बोलतो आहेस. प्रसादचे म्हणणे आहे, तुझ्या मते त्यांनी केलं ? तेजस्विनी म्हणाली, मी अनुभव घेतला आहे. प्रसाद म्हणाला, तू अनुभव घेतलास ना पण तू त्याला तितकाच दुजोरा देखील दिला आहेस, हे मी अनुभवलं आहे.
सुरुवातीपासून जेव्हा मी म्हणत होतो जेव्हा अमृता तिकडे जात होती, योगेश होता, हि सगळी चर्चा चालू असताना मी बोले कि नाही कित्येकवेळा तेजू ऐक तिला जायचं आहे त्याच्याबद्दल वाद नाही मी जर बोलतो आहे त्याच्याबद्दल वाद नका ठेऊ. कारण नसताना या छोट्या छोट्या गोष्टींचं झाड होणार मोठं जे झालेलं आहे. पुढे हा वाद किती वाढत जाणार हे आपल्याला आजच्या भागात कळेल.