Bigg Boss Marathi 3: “तुला माणसांची किंमत नाहीये” ,सोनाली पाटील विशाल निकमवर भडकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 12:57 IST2021-10-22T12:57:25+5:302021-10-22T12:57:55+5:30
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांमध्ये रूसवे – फुगवे होतच असतात... आपली जवळची व्यक्ति थोडं जरी वेगळं वागली, त्यांचा निर्णय आपल्या निर्णयापेक्षा वेगळा असला किंवा आपल्याला त्यांनी साथ दिली नाही तर लगेच सदस्यांना वाईट वाटतं.

Bigg Boss Marathi 3: “तुला माणसांची किंमत नाहीये” ,सोनाली पाटील विशाल निकमवर भडकली
आता माझी सटकली, सोनालीचा राग पुन्हा एकदा अनावर... विशालच्या कुठल्या निर्णयामुळे आणि कोणत्या कृतीमुळे सोनालीला इतकं वाईट वाटलं आहे ? बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांमध्ये रूसवे – फुगवे होतच असतात... आपली जवळची व्यक्ति थोडं जरी वेगळं वागली, त्यांचा निर्णय आपल्या निर्णयापेक्षा वेगळा असला किंवा आपल्याला त्यांनी साथ दिली नाही तर लगेच सदस्यांना वाईट वाटतं. असंच काहीसं आज सोनाली आणि विशालमध्ये घडणार आहे. घरामध्ये विशाल आणि सोनालीची भांडण, मस्करी सुरूच असते. पण आजची गोष्ट सोनालीच्या मनाला खूपच जास्त लागली आहे असे तिच्या बोलण्यावरून दिसून येते आहे.
सोनाली विशालला म्हणाली, “जर मी तुझ्यामध्ये टाईम इनव्हेस्ट करते तर मला तुझ्याकडून रिटर्नची अपेक्षा आहे. विशाल म्हणाला, मी नाही करत का टाईम इनव्हेस्ट. सोनाली त्यावर म्हणाली, त्यांच्यातल्या गृपमधील सदस्यांनी कोणाचं दुसर्याच नावं घेतलं का ? तू का नाही माझं नावं घेतलंसं. विशालचं म्हणण आहे, मला जे वाटलं ते मी केलं. सोनाली म्हणाली, पहिल्या आठवड्यात माझा आवाज मोठा आहे म्हणून बोललं गेलं. तेव्हापासून तुला माहिती आहे, बाकीच्यांना नसेल माहिती एखादवेळेस... तू फालतू कारणं देवू नकोस. विशाल म्हणाला फालतू नाहीये कारण, असं कसं बोलू शकतोस. सोनाली म्हणाली, “फालतूचं आहे कारण. तुला ना माणसांची किंमत नाहीये. खूप कमी किंमत आहे. प्रत्येकवेळेला असं झालेलं आहे”.