Bigg Boss Marathi 3: विकासला विशालची आवडत नाही ही गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 19:11 IST2021-11-24T19:08:00+5:302021-11-24T19:11:01+5:30
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनची खूप चर्चा होताना दिसते आहे.

Bigg Boss Marathi 3: विकासला विशालची आवडत नाही ही गोष्ट
बिग बॉस मराठीचा तिसरा सीझन चांगलाच चर्चेत येताना दिसतो आहे. घरामध्ये सदस्यांना एकमेकांचे वागणे खटकताना दिसते आहे.... आणि त्या संदर्भात ते इतर सदस्यांची चर्चा करताना देखील दिसून येतात. आज एकीकडे विशाल जय आणि उत्कर्षशी खेळाविषयी चर्चा करताना दिसणार आहे तर दुसरीकडे विकास मीनलसोबत विशालबद्दल बोलताना दिसणार आहे. नक्की काय विकासच्या मनात... त्याला विशालची कोणती गोष्ट आवडत नाही आहे.
विकास मीनलशी बोलताना दिसणार आहे, तरी मला आता जे दिसते आहे, तो गेल्या काही दिवसांपासून त्या गोष्टी करतो आहे. तिकडे जाऊन बोलतो आहे. त्याला असं कुठेतरी वाटतं आहे की हे आपण केले पाहिजे... दिसलं पाहिजे. सर पण जे बोले की विकेंडला माझ्याविषयी की जाऊन बोलतो... हे आपण करू शकतो. पण मी तेच म्हणतो आहे की हा त्याचा गेम नाही.... हा माझा गेम आहे. म्हणजे बोलणे म्हणा किंवा काही ते पण आता मी कमी केले आहे. त्यातून काही चांगले निष्पन्न होत असेल तर काही चुकीचे नाही...
विशाल-सोनाली येणार पुन्हा चर्चेत
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये विशाल आणि सोनाली काही ना काही मुद्द्यावरून चर्चेत असतातच मग ते त्यांचे भांडण असो वा वादावादी वा रूसवे फुगवे... आज विशाल, विकास आणि सोनालीच्या गप्पा सुरू असताना देखील असंच काहीसं झाले, हे सर्व आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.