Bigg Boss Marathi 3 Upadate:कोणाचं कारणं घरच्यांना पटणार मीरा की विकास ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 19:17 IST2021-11-30T19:15:59+5:302021-11-30T19:17:30+5:30
Bigg Boss 3 Update: स्पर्धकांचे कुटुंब घरात आल्यानंतर घराविषयी आणि घरातल्या लोकांविषयी आपले मत व्यक्त करताना दिसतील.

Bigg Boss Marathi 3 Upadate:कोणाचं कारणं घरच्यांना पटणार मीरा की विकास ?
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सदस्यांना भेटायला येणार आहेत त्यांच्या कुटुंबातील सदस्य. जवळपास ६५ दिवसाहून अधिक कालावधीनंतर आपल्या परिवारातील सदस्यांना स्पर्धक भेटणार आहेत, नक्कीच हा सगळ्याच स्पर्धकांसाठी भावुक करणारा क्षण ठरणार आहे. स्पर्धकांचे कुटुंब घरात आल्यानंतर घराविषयी आणि घरातल्या लोकांविषयी आपले मत व्यक्त करताना दिसतील.स्पर्धक कुठे चुकताये ? त्यांची खेळी कशी असावी ? याविषयी सुचना देताना दिसतील.
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून आपण पाहिलं विकासला भेटण्यासाठी त्याची बायको घरामध्ये आली. तर जयला त्याच्या आई वडिलांनी भेट दिली. पण या भेटीसाठी देखील सदस्यांना बिग बॉस एक टास्क देणार आहे असे दिसते आहे. ज्यामध्ये सदस्यांना किती वेळ द्यावा याचा निर्णय घरातील सदस्य ठरवणार आहेत. जास्तीत जास्त वेळ आपल्याला का देण्यात यावा याचे कारण घरातील इतर सदस्यांना सांगायचे आहे. आणि याचवरून मीरा विकासला मनवण्याचा प्रयत्न करते आहे.
मीरा विकासला सांगताना दिसणार आहे, खरंच मला खूप गरज आहे कारण ते बोलतसुध्दा नाही माझ्याशी तर या कारणामुळे बोलायला तरी लागतील. मला असं वाटतं माझं सगळयात खरं कारणं आहे. पाच वर्ष झाली ते बोलत नाहीत, भेटायचे सोड. सोनाली त्यावर म्हणाली, मला असं वाटतं इतक जर सेन्सीबल कारणं असेल तर विकास आपण विचार करूया.
मीरा म्हणाली, एकच गोष्ट फक्त अॅडजस्ट कर विकास. एका मिनिटाने नाही फरक पडणार. तू त्यांच्यासोबत राहतोस तरी... विकास म्हणाला, काही गोष्ट आहे. मी इथे नाही बोलू शकतं. मीराचे म्हणणे आहे, माझं पण तेच आहे, इथे नाही बोलू शकतं, ज्या त्यांच्याशी मला बोलायच्या आहेत. या कारणामुळे बोलायला लागतील माझ्याशी... चर्चा पुढे अशीच सुरू राहिली. आगामी भाग पाहणे रसिकांसाठी नक्कीच रंजक असणार आहे.