Bigg Boss Marathi 3 Upadate: घरात अचानक बदलली स्पर्धकांची खेळी, गायत्री दातार ठरते निशाण्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 15:42 IST2021-12-02T15:29:26+5:302021-12-02T15:42:17+5:30
Bigg Boss Marathi 3 Update: गायत्री दातारचं वागणं इतरांना खटकतंय, जय, उत्कर्ष आणि मीराची चर्चा होणार आहे.

Bigg Boss Marathi 3 Upadate: घरात अचानक बदलली स्पर्धकांची खेळी, गायत्री दातार ठरते निशाण्यावर
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता विशाल,विकास, सोनाली आणि मीनलमध्ये सगळं काही ठीक सुरू आहे असे दिसतंय. पण,गायत्रीच्या वागण्याचा तिघांना म्हणजेच जय, उत्कर्ष आणि मीराला राग आला आहे असे त्यांच्या आजच्या वागण्यावरून कळते. काही दिवसांपासून गायत्री टीम B मध्ये जाऊन बसत असल्याने ती भेडचालमध्ये खेळते, जिथे बहुमत असते तिथेच ती जाते असे अनेक आरोप जय तिच्यावर करताना दिसणार आहे. आज याचविषयी जय, उत्कर्ष आणि मीराची चर्चा होणार आहे.
जय बोलताना दिसणार आहे, गायत्री विकासच्या जवळ जायचा प्रयत्न करते. मीरा हे त्याला कालच सांगणार होती असे तिचे म्हणणे आहे विकास आणि सोनालीच्या. जय पुढे म्हणाला, ते दोघे तिला कलटी देणार... हे दिसतं आहे की ती मुद्दाम तसं प्रयत्न करते आहे जवळ जवळ जाण्याचा. कुठे तो गेला की तिकडे ती. मीरा म्हणाली, हेच आधी ती माझ्या मागे मागे करायची.
जय पुढे म्हणाला, त्यांच्यामध्ये नक्कीच वाद होणार, कारण ती काय करते आहे त्याची पहिली प्रायोरिटी बनण्याचा प्रयत्न करते आहे. मीरा म्हणाली, तिथे सगळ्यांमध्ये इनसेक्यरिटी चालू झाली आहे आता. जयच्या मते या सगळ्यांमध्ये स्मार्ट जर कोणी असेल तर तो विशाल आहे. आता विशाल त्यांचा वापर करणार. विशालला माहिती आहे त्यांच्यामध्ये जर कोणी खेळणार असेल तर ती मीनल आहे. ज्यावेळेस डिपेंडन्सी टास्क येणार तो मीनलसोबत डील करणार, यांना बघणार पण नाही. आता विरुध्द टीममध्ये बहुमत झाल्याने जय, उत्कर्ष आणि मीराला सहन होत नाहीये की गायत्रीच्या वागण्याचा त्रास होती आहे की राग येतो आहे कळेल हळूहळू.