Bigg Boss Marathi 3 Upadate: गैरसमज अजून किती वाढणार, विकास – मीनलमध्ये रंगली चर्चा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 14:27 IST2021-11-26T14:22:50+5:302021-11-26T14:27:38+5:30
विकास मीनलाला सांगतो मला जे योग्य वाटेल ते मी करणार आणि तुला जे योग्य वाटेल ते तू करणार ठरलं आहे ना.

Bigg Boss Marathi 3 Upadate: गैरसमज अजून किती वाढणार, विकास – मीनलमध्ये रंगली चर्चा !
बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धक सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टींवरुन चर्चा करताना दिसतात. टास्क होण्याआधी टास्क झाल्यानंतर कोणता ना कोणता ना स्पर्धक चर्चा करण्यात बिझी असतोच. घरात आता आणखी एका गोष्टीवरुन प्रचंड चर्चा होत आहे. यावेळी ग्रुप्समध्ये नाहीतर केवळ दोन स्पर्धक चर्चेत झालेत मग्न.
आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सोनाली आणि मीनलच्या चर्चेनंतर, मीनल विकासला समजवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण, विकासला कुठेतरी तिचे म्हणणे पटत नाहीये असे दिसून येते आहे. मीनल विकासला सांगताना दिसणार आहे, माझं असं म्हणणं आहे, मस्करी मस्करीमध्ये थोडं जास्त होतं आहे. जाऊ दे विकास कारण का त्रास होतो आहे तिला चांगलं नाही वाटतं आहे.
विकास त्यावर म्हणाला, आता मी आजचा इन्सीडंन्स तुला सांगू... मीनल म्हणाली, नको करूस. प्लीज. विकास त्यावर म्हणाला, कारण मी करेक्ट आहे हे तुम्हांला ऐकायचंच नाहीये. तुम्हांला हे सिध्द करायचे आहे तू चूक आहेस. मीनल म्हणाली, असं काही नाही. याच्यापुढे नको करू. माझं तुला हे सांगण आहे, यापुढे तुला जे योग्य वाटेल ते कर विकास.
विकास म्हणाला, मला जे योग्य वाटेल ते मी करणार आणि तुला जे योग्य वाटेल ते तू करणार ठरलं आहे ना ... मीनल म्हणाली, नको वाढवूस त्या गोष्टी पर्सनल लेवलवर. विकासला वाटते आहे त्याला व्हिलन बनवत आहेत. त्याचे मीनलला सांगणे आहे तू त्याच्यात सामील नको हाऊस आता हे भांडण, गैरसमज अजून किती वाढणार, एकमेकांना हे समजून घेणार का ? हे प्रश्न आहेतच.