Bigg Boss Marathi 3 : महेश मांजरेकर यांनी या कारणामुळे बिग बॉस शोमधून घेतली माघार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 20:08 IST2021-12-13T20:07:39+5:302021-12-13T20:08:51+5:30
Bigg Boss Marathi 3: आता सिद्धार्थ जाधव महेश मांजरेकरांची भूमिका बजावताना दिसणार आहे.

Bigg Boss Marathi 3 : महेश मांजरेकर यांनी या कारणामुळे बिग बॉस शोमधून घेतली माघार
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि लोकप्रिय शो बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi 3) च्या तिसऱ्या सीझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आता बिग बॉस मराठी ३च्या घरात फक्त सातच स्पर्धक बाकी आहेत. त्यामुळे लवकरच या स्पर्धकांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपणार आहे. त्यामुळे विजेता कोण ठरणार याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. आता महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar)देखील आरोग्याच्या कारणामुळे बिग बॉस मराठी शोमध्ये पाहायला मिळणार नाहीत.
महेश मांजरेकर यांच्या जागी आता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) महेश मांजरेकरांची भूमिका बजावताना दिसणार आहे. मागच्याच भागात स्वतः महेश मांजरेकरांनीच याबाबत स्पष्टीकरण देखील दिले आहे. थोडेच भाग शिल्लक असताना अनेकांनी ते शो का सोडत आहेत असा प्रश्न देखील उपस्थित केला होता. महेश मांजरेकर यांची सध्या तब्येत चांगली नसल्यामुळे त्यांना बिग बॉस मराठी ३ शो मध्येच सोडावा लागला. बिग बॉसचे शोचे आता थोडेच भाग शिल्लक आहेत.
'तुझ्या रुपाच चांदणं' ही नवीन मालिका येणार भेटीला
बिग बॉस नंतर आता कोणती मालिका कलर्स मराठीवर प्रसारीत होणार, हे जाणून घेण्यासाठी सर्व उत्सुक आहेत. बिग बॉस मराठी ३च्या जागेवर दररोज रात्री साडे नऊ वाजता तुझ्या रुपाच चांदणं ही मालिका प्रदर्शित होणार आहे. यामध्ये समाजात असलेला काळ्या रंग भेदभावाविषयी, तिरस्कार या गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ही मालिका एका हिंदी मालिकेचा रिमेक आहे. हिंदीमध्ये लागी तुझसे लगन या मालिकेच्या कथेवर आधारित ही मालिका आहे. हिंदीमध्ये नकुषा नावाचे मुख्य पात्र माही वीजने साकारले होते. आता तुझ्या रुपच चांदणं या मालिकेमध्ये अभिनेत्री तन्वी शेवाळे मुख्य नक्षी हे पात्र साकारताना दिसणार आहे.