Bigg Boss Marathi 3: जयला घरातील 'हा' सदस्य ट्रॉफीपासून वाटतो लांब
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 16:35 IST2021-12-03T16:34:59+5:302021-12-03T16:35:34+5:30
Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज येणार आहेत दोन खास पाहुणे सुशांत शेलार आणि माधव देवचके.

Bigg Boss Marathi 3: जयला घरातील 'हा' सदस्य ट्रॉफीपासून वाटतो लांब
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज येणार आहेत दोन खास पाहुणे सुशांत शेलार आणि माधव देवचके. या दोघांनी सदस्यांसोबत बरीच धम्माल मस्ती केली, गप्पा मारल्या आणि सदस्यांना टास्कदेखील दिले. ज्यामध्ये मीराच्या मते गायत्री आणि जयच्या मते विकास ट्रॉफीपासून लांब आहेत असं त्यांना वाटते आहे. त्यांनी त्याची कारणे देखील सांगितली.
मीराचे म्हणणे आहे, मला आता या स्टेजला येऊन असे वाटते आहे की, गायत्री मागे आहे. तिची सवय दुसर्यांना बोलताना नेहमी मागे पाडणे आणि गेममध्ये जरी टीममध्ये असलो तरीही एकटी अशी ती मला दिसत नाही. माझं हे एकंच कारण आहे की गेममध्ये टीममध्ये खेळताना सुध्दा एकटी कुठेतरी तू दिसून ये आणि खेळ. जयने विकासचे नाव घेतले.
१९-२० चा फरक आहे सर्व सदस्यांमध्ये
जय म्हणाला, ऑफकोर्स सगळे डिझर्व्ह करतात. मी हे नेहमीच म्हणत आलो की १९- २० चा फरक आहे आता सगळ्या सदस्यांमध्ये. जो सदस्य ट्रॉफी पासून जरा लांब आहे तो आहे विकास. कारण, जे आपण म्हणतो स्पोर्ट्स मॅन स्पिरीट पाहिजे खेळाडूमध्ये ते कुठतेरी कमी आहे अजूनही असे मला वाटते.