'बिग बॉस'फेम सोनाली-मीनलच्या मैत्रीत फूट? दोघींच्या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 11:34 IST2022-04-29T11:33:15+5:302022-04-29T11:34:23+5:30

Sonali patil and meenal shah: सध्या सोशल मीडियावर मीनल आणि सोनाली यांच्यातील वादाची चर्चा रंगली आहे.

bigg boss marathi 3 fame sonali patil and meenal shah fight video viral | 'बिग बॉस'फेम सोनाली-मीनलच्या मैत्रीत फूट? दोघींच्या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल

'बिग बॉस'फेम सोनाली-मीनलच्या मैत्रीत फूट? दोघींच्या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल

छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठी (bigg boss marathi) या वादग्रस्त रिअॅलिटी शोचं तिसरं पर्व तुफान गाजलं. या शोमधील प्रत्येक टास्कप्रमाणेच त्यात सहभागी झालेल्या स्पर्धकांची मैत्रीही चांगलीच चर्चेत राहिली. यात अजूनही विशाल निकम- विकास पाटील, मीरा राजपूत -जय दुधाणे आणि मीनल शहा-सोनाली पाटील या सहा जणांच्या जोडीची अद्यापही सोशल मीडियावर चर्चा होते. यात मीनल आणि सोनाली यांच्यातील मैत्री काही औरच आहे. अनेकदा या दोघी एकमेकींसोबत मज्जा मस्ती करतांना स्पॉट होत असतात. बऱ्याचदा त्या दोघी एकमेकींसोबतचे फोटोही पोस्ट करतात. मात्र, यावेळी त्या त्यांच्यातील भांडणामुळे चर्चेत आल्या आहेत.

सध्या सोशल मीडियावर मीनल (meenal shah ) आणि सोनाली (sonali patil) यांच्यातील वादाची चर्चा रंगली आहे. एकमेकींसोबत अनेकदा मज्जेशीर व्हिडीओ शेअर करणाऱ्या या जोडीने यावेळी त्यांच्यातील हाणामारीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या सोनालीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मीनल आणि ती एकमेकींसोबत मारामारी करताना दिसत आहे. परंतु, या दोघींची ही खरोखरची मारामारी नसून त्या मस्ती करत आहेत. 

दरम्यान, या दोघींमधील ही बॉण्डिंग नेटकऱ्यांना प्रचंड आवडली असून अनेक जण त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. "टास्क अभी बाकि हैं मेरे दोस्त.......Crime partner MONA", असं कॅप्शन सोनालीने या व्हिडीओला दिलं आहे.

Web Title: bigg boss marathi 3 fame sonali patil and meenal shah fight video viral