'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणेने खरेदी केली महागडी कार; पोस्ट शेअर करत वडिलांच्या आठवणीत झाला भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 09:36 IST2024-09-06T09:32:33+5:302024-09-06T09:36:02+5:30

'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणेने गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर नवीकोरी कार खरेदी केली आहे.

bigg boss marathi 3 fame jay dudhane buy new mg hector car share photo on social media | 'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणेने खरेदी केली महागडी कार; पोस्ट शेअर करत वडिलांच्या आठवणीत झाला भावुक

'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणेने खरेदी केली महागडी कार; पोस्ट शेअर करत वडिलांच्या आठवणीत झाला भावुक

Jay Dudhane New Car :'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणेने गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर नवीकोरी कार खरेदी केली आहे. याची माहिती त्याने सोशल मीडियाच्या आधारे दिली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

जयने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरी पोस्ट केली आहे. त्याद्वारे त्याने चाहत्यांनी गोड बातमी दिली. 'एम जी हेक्टर' ही कार त्याने खरेदी केली आहे. मार्केट व्हल्यूनुसार या कारची किंमत जवळपास १३.९९ लाख इतकी आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याची आई-बहीण देखील दिसत आहे. शिवाय २४ जून रोजी जयच्या वडिलांचे कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे निधन झाले. आपले सोबत नसल्यामुळे अभिनेत्याची बहीण वडिलांचा फोटो हातात घेऊन उभी असल्याचं फोटोमध्ये दिसतंय. 

जयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, अनेक रिएलिटी शोमधून काम करून प्रेक्षकांची मनं जिंकली.पण, 'बिग बॉस मराठी' या शोने त्याला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली.  या शोनंतर त्याच्या चाहत्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अलिकडेच तो स्टार प्रवाहवरील 'येड लागंल प्रेमाचं' या मालिकेमुळे चर्चेत आला होता. पण, काही वैयक्तिक कारणाने त्याने मालिकेतून एक्झिट घेतली. 

'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या स्पर्धाकांपैकी तो एक होता. आपल्या दमदार खेळीने त्याने या पर्वाच्या टॉप ३ स्पर्धकांमध्ये आपली  जागा निर्माण केली. त्यापू्र्वी जय 'MTV स्प्लिट्सविला' या कार्यक्रमात देखील झळकला होता. 

Web Title: bigg boss marathi 3 fame jay dudhane buy new mg hector car share photo on social media