Bigg Boss Marathi 3 Episodes, 8 Oct: कोण होणार पुढील आठवड्याचा कॅप्टन ?, टीम Bला मिळाली सुवर्णसंधी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 13:17 IST2021-10-08T13:17:09+5:302021-10-08T13:17:49+5:30
Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू असलेले 'जिंकू किंवा लढू' हे साप्ताहिक कार्य नुकतेच संपले. या साप्ताहिक कार्यामध्ये टीम A विजयी ठरली.

Bigg Boss Marathi 3 Episodes, 8 Oct: कोण होणार पुढील आठवड्याचा कॅप्टन ?, टीम Bला मिळाली सुवर्णसंधी !
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू असलेले “जिंकू किंवा लढू” हे साप्ताहिक कार्य नुकतेच संपले. या साप्ताहिक कार्यामध्ये टीम A विजयी ठरली. नियमांनुसार या विजेत्या टीमच्या सदस्यांना आठवड्यातील कॅप्टन पदाची उमेदवारी मिळणार आहे. बिग बॉस यांनी घोषित केले या टीममधील सदस्यांनी विचार विनिमय करून दोन सदस्यांची नावे कॅप्टन्सीसाठी द्यावी. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टनशीप सोबतच खूप मोठी जबबाबदारी देखील येते. आता कॅप्टन बनण्याचा बहुमान कोणाला मिळणार हे आज कळेलच.
टीम A मधील सदस्यांनी या विषयावर चर्चा करण्यास काल सुरूवात केली. प्रत्येक सदस्य आपण कॅप्टनसीच्या उमेदवारीसाठी कसे योग्य आहेत आणि त्यांना इच्छा आहे त्यांनाच उमेदवारी मिळावी हे स्पष्ट करू लागले. जयचे म्हणणे होते मला उमेदवारी मिळाली पाहिजे, मीराने सांगितले मी माझेच नाव पुढे करेन, विशालचे म्हणणे होते कॅप्टन म्हणून मला निवडावे अशी विनंती आहे. पण नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी जाहीर केले आहे टीम A एकमताने निर्णय घेण्यास असमर्थ ठरली आहे त्यामुळे आता ही संधी टीम B ला मिळत आहे. टीम B ला ही सुवर्णसंधीच मिळाली आहे. आता टीम B या संधीचा कसा योग्यपणे वापर करेल ? कोणत्या दोन सदस्यांची नावे पुढे येतील ? कोण बनेल पुढच्या आठवड्याचा कॅप्टन ? हे आजच्या भागामध्ये कळेल.
सदस्यांचा 'डान्स पे चान्स'
तसेच आज बिग बॉसने घरातील सदस्यांवर 'डान्स पे चान्स' हे टास्क सोपाविले आहे. घरातील सदस्य दोन जणांची टीम करून वेगवेगळ्या गाण्यांवर डान्स करताना दिसणार आहे. त्यामुळे आज प्रेक्षकांना धमाल मस्ती पहायला मिळणार आहे.