Bigg Boss Marathi 3, Episodes, 7 Nov: सोनाली, जय की तृप्ती? ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरातून कोण होणार ‘आऊट’?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 12:26 IST2021-11-07T12:24:46+5:302021-11-07T12:26:48+5:30
Bigg Boss Marathi 3, Episodes, 7 Nov : ‘बिग बॉस मराठी 3’चा रविवार म्हणजे एलिमिनेशन डे. होय, आज बिग बॉसच्या घरातील आणखी एका सदस्याचा प्रवास संपुष्टात येणार.

Bigg Boss Marathi 3, Episodes, 7 Nov: सोनाली, जय की तृप्ती? ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरातून कोण होणार ‘आऊट’?
‘बिग बॉस मराठी 3’चा रविवार म्हणजे एलिमिनेशन डे. होय, आज बिग बॉसच्या घरातील आणखी एका सदस्याचा प्रवास संपुष्टात येणार. गेल्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्कमध्ये विशाल निकम, मीनल शहा, जय दुधाणे, तृप्ती देसाई आणि सोनाली पाटील असे पाच सदस्य नॉमिनेट झाले होते. काल शनिवारी लोकांच्या मतांच्या आधारावर यापैकी दोन सदस्य सेफ झालेत. ते म्हणजे मीनल शहा आणि विशाल निकम. विशाल गेल्या आठवड्यातही नॉमिनेट झाला होता. मात्र लोकांनी त्याला सेफ केलं होतं. या आठवड्यातही त्याला जीवदान मिळालं. मीनलचा फेअर गेम आवडल्याने प्रेक्षकांनी तिलाही सेफ केलं.
विशाल व मीनल सेफ झाल्याने उर्वरित तीन सदस्य डेंजर झोनमध्ये आहेत. ते म्हणजे जय दुधाणे, तृप्ती देसाई आणि सोनाली पाटील. या तिघांपैकीच एक सदस्य आजच्या एपिसोडमध्ये घराबाहेर पडणार आहे. जय व तृप्ती तसे दोघेही तुल्यबळ स्पर्धक आहेत. या दोघांच्या तुलनेत सोनाली तशी फार चमकली नाही. उत्तम खेळाडू असली तरी बिग बॉस मराठीच्या घरात तिचा खास खेळ दिसला नाहीच. साहजिक जय व तृप्तींचं पारडं जड आहे. त्यामुळे सोनाली पाटीलला जर मतं कमी मिळाली तर ती आज घराबाहेर पडू शकते.
पण बिग बॉस शेवटी लोकांच्या मतांच्या आधारावर चालणारा खेळ आहे. त्यामुळेच निकाल कसा धक्का देईल, हे सांगता यायचं नाही. त्यामुळेच या आज नेमकं कोण घराबाहेर पडणार हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे.