Bigg Boss Marathi 3: "कॅप्टन झाली म्हणून डोक्यावर बसू नको", विकास आणि मीनलमध्ये तूफान राडा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 20:10 IST2021-12-14T18:38:56+5:302021-12-14T20:10:22+5:30
बिग बॉस मराठी (bigg boss marathi)च्या घरात आता शेवटचे ७ स्पर्धक राहिले असून प्रत्येकामध्ये कमालीचे मतभेद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Bigg Boss Marathi 3: "कॅप्टन झाली म्हणून डोक्यावर बसू नको", विकास आणि मीनलमध्ये तूफान राडा !
छोट्या पडद्यावर तुफान गाजत असलेला शो म्हणजे बिग बॉस मराठी (bigg boss marathi). सध्या या शोचं तिसरं पर्व सुरु असून हा शो आता ग्रँड फिनालेच्या दिशेने वाटचाल करत आहे. या घरात आता शेवटचे ७ स्पर्धक राहिले असून प्रत्येकामध्ये कमालीचे मतभेद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे असाच मतभेद आता मीनल आणि विकासमध्ये होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या इतक्या दिवसांच्या मैत्रीत फुट पडणार का असा प्रश्न उपस्थित होतोय.
प्रोमोमध्ये जय आणि उत्कर्ष केक खाताना दिसतं आहेत, हा टास्कचाच एक भाग आहे. ज्यामध्ये विकास बोलताना दिसणार आहे, मीनल शहा यांनी या सिझनचा सगळ्यात मोठा चुकीचा निर्णय दिलेला आहे. मीनल चिडून त्यावर म्हणली, तू नेहेमी रडत असतो, विशालला सांगताना दिसणार आहे, स्वत: जेव्हा perform करायचं होतो प्रत्येकाने तेव्हा काय परफॉर्म केलं त्यानं. विकास म्हणाला, कॅप्टन झाली म्हणून डोक्यावर बसू नको. मीनलला राग अनावर झाला आणि ती विकासला म्हणाली, मग तू घरी जा..बघूया हा वाद अजून किती वाढत गेला आजच्या भागामध्ये.