Bigg Boss Marathi 3 : ‘बिग बॉस मराठी’चे चाहते असाल तर ही बातमी नक्की वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 13:57 IST2020-02-07T13:55:00+5:302020-02-07T13:57:21+5:30

Bigg Boss Marathi 3 : मराठमोळ्या ‘बिग बॉस’ प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी...

bigg boss marathi 3 coming soon | Bigg Boss Marathi 3 : ‘बिग बॉस मराठी’चे चाहते असाल तर ही बातमी नक्की वाचा

Bigg Boss Marathi 3 : ‘बिग बॉस मराठी’चे चाहते असाल तर ही बातमी नक्की वाचा

ठळक मुद्दे‘बिग बॉस हिंदी’च्या धर्तीवर साकारण्यात आलेल्या ‘बिग बॉस मराठी’चे आत्तापर्यंतचे दोन्ही पर्व तुफान लोकप्रिय झालीत.

सध्या टीव्हीवर ‘बिग बॉस 13’ शोची चर्चा आहे. ‘बिग बॉस 13’चा विजेता कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच आता मराठमोळ्या ‘बिग बॉस’ प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, वेगवेगळे रोमांचक टास्क, लव्ह-रोमान्स, वाद प्रतिवाद शिवाय महेश मांजरेकरांचा खुमासदार वीकेंडचा वार अशी भरगच्च मेजवाणी घेऊन येणारा  ‘बिग बॉस मराठी’ हा रिअ‍ॅलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सोशल मीडियावर त्याची खमंग चर्चा रंगली आहे.

‘बिग बॉस हिंदी’च्या धर्तीवर साकारण्यात आलेल्या ‘बिग बॉस मराठी’चे आत्तापर्यंतचे दोन्ही पर्व तुफान लोकप्रिय झाले. पहिल्या पर्वामध्ये अभिनेत्री मेघा धाडे विजयी झाली. यानंतरच्या ‘बिग बॉस मराठी’च्या दुस-या पर्वाने तर लोकप्रियतेचा कळस गाळला. अमरावतीचा शिव ठाकरे या पर्वाचा विजेता ठरला. या दोन्ही पर्वानंतर ‘बिग बॉस मराठी’चे तिसरे पर्व कधी येणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. तेव्हा प्रेक्षकांची प्रतीक्षा लवकरच संपणार असून ‘बिग बॉस मराठी 3’ लवकरच येणार असल्याचे कळतेय.


‘‘राजश्री मराठी’ने फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर करून ही माहिती दिली आहे. या व्हिडीओत बिग बॉसचा मंच दिसत असून नवीन सीझन लवकरच सुरु होणार असल्याची चर्चा सुरु असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या सीझनमध्ये अंतराळाची थीम ठेवण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.  अद्याप तिस-या सीझनची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ‘बिग बॉस’ प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 
यंदाच्या ‘बिग बॉस मराठी’च्या तिस-या सीझनमध्ये कोण कोण स्पर्धक सहभागी होणार,काय नवीन पाहायला मिळणार हे कळायला अद्याप काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. ही प्रतीक्षा कधी संपते ते बघूच.
  

Web Title: bigg boss marathi 3 coming soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.