Bigg Boss Marathi 3: तुमच्या सगळ्यांची अप्रत्यक्षपणे काढली लायकी - आदिश वैद्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 16:48 IST2021-10-15T16:48:33+5:302021-10-15T16:48:59+5:30
Bigg Boss Marathi 3: 'करूया आता कल्ला' या टास्कमध्ये काल सुरेखा ताईंनी आदिशला सुनावले

Bigg Boss Marathi 3: तुमच्या सगळ्यांची अप्रत्यक्षपणे काढली लायकी - आदिश वैद्य
बिग बॉस मराठीमध्ये सुरू असलेल्या “करूया आता कल्ला” या टास्कमध्ये काल सुरेखा ताईंनी आदिशला सुनावले तू आता आला आहेस BB मध्ये आम्ही जुने आहोत. त्यावरून आदिशला सुरेखा कुडची यांचा प्रचंड राग आला. आणि त्यावरूनच तो आज विशाल, विकास, आविष्कार आणि सोनालीसमोर त्याचं मत मत मांडताना दिसणार आहे. आता यावरून घरामध्ये अजून कोणता राडा होणार हे आजच्या भागामध्ये कळेलच.
आदिश सुरेखा ताईंवर आज खूप भडकेला दिसणार आहे आणि त्याच्या मनातल्या गोष्टी तो विशाल, विकास, आविष्कार आणि सोनालीसमोर सांगणार आहे.आदिश म्हणाला, “आता टास्कमध्ये जास्त मला बोलायचे नाही, आता टास्क पहिले होऊन जाऊदे. स्वत:ला जायचे होते कालपर्यंत बाहेर.. रडारड केली चार दिवस. माझे काय, मला खेळायचे नाही म्हणून. थँक्य यू नोट देताय का आतापासून... जाना मग. मी तुम्हांला स्पष्ट सांगतो वाईट नका मानून घेऊ, तुमची लायकी काढली आहे सगळ्यांची. तुमची अप्रत्यक्षपणे लायकी काढली. त्यावर सोनाली म्हणली “ती काय लायकी काढणार आमची. विशाल तुला रागाबद्दल बोलले तुलाच का रागाबद्दल बोलले दुसरे कोणी रागावले नाही का यांच्या टीममधले ? हे जे फालतू थिल्लरपणा करतात ते बरोबर आहे का ? तुझा राग दिसतो ? स्नेहासोबत बरोबर गोडगोड बोलतात... मग”
सोनाली म्हणाली, “टॉप ५ मध्ये कोण आहे हे आता ही ठरवणार ? आणि कालपर्यंत रडत होती. माझे काही चालणार नाही, हे होणार नाही ते होणार नाही. हा रूल तुम्ही सगळ्यांना दिला का टॉप ५ कोण आहे हे सांगता?” नक्की काय झाले ते आजच्या भागात पहायला मिळणार आहे.