Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकलेंवर का चिडली शिवानी ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 15:32 IST2019-08-21T15:30:27+5:302019-08-21T15:32:05+5:30
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अभिजीत बिचुकले त्यांच्या वादग्रस्त बोलण्यावरून, वागण्यावरून नेहेमीच चर्चेत असतात.

Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकलेंवर का चिडली शिवानी ?
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अभिजीत बिचुकले त्यांच्या वादग्रस्त बोलण्यावरून, वागण्यावरून नेहेमीच चर्चेत असतात. बिचुकले यांना नक्की काय बोलायचे आहे याबद्दल सदस्यांनाच्या मनामध्ये नेहेमीच प्रश्नचिन्ह असते.त्यांच्या बोलण्यावरून महेश मांजरेकर देखील बर्याचदा त्यांची WEEKEND चा डावला शाळा घेतात. काल देखील सुरेखा पुणेकर यांना उद्देशुन केलेल्या वक्तव्यावर सदस्यांनी त्यांना खडेबोल सुनावले आहेत.
आज, शिवानी आणि अभिजीत बिचुकले यांच्यामध्ये वाद होणार आहे. किशोरी शहाणे यांचे म्हणणे होते, “तुम्ही बोलता म्हणजे असं नाही की मी विश्वास ठेवते”.
अभिजीत बिचुकले शिवानीला असे म्हणाले, “आपण दोघे जिथून आलो आहे ना” या वाक्यावर शिवानी भडकली आणि म्हणाली की “कुठून आलो आहे आपण दोघे ? त्यावर बिचुकले यांचे म्हणणे होते “आपण सुट्टीवरून आलो आहे ना”. या म्हणण्यावर शिवानीचा पारा अजूनच चढला ती पुढे त्यांना म्हणाली, “मूर्ख माणूस, कुठे गेला होतात ? गप्प बसा. अभिजीत बिचुकले कोणाच्या म्हणण्यावर गप्प बसतील हे कठीणच.
आरोहने शिवानीला सल्ला दिला उगाचच चिडचिड करू नकोस. त्यावर देखील बिचुकले यांना बोलायचे होते, बिचुकले म्हणाले “मला शांत करते आहे ती”. शिवानी आरोहला म्हणाली, “आपण दोघे कुठून आलो कुठून आलो करत असतात, यांच्याबरोबर कुठे गेले होते मी ?” पुढे काय घडले हे आजच्या भागामध्ये कळेलच.
बिचुकले पुढे काय म्हणाले ? हे आजच्या भागात कळेल.