Bigg Boss Marathi 2 : ही सदस्य झळकली होती हिना खानच्या लोकप्रिय हिंदी मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 20:00 IST2019-08-04T20:00:00+5:302019-08-04T20:00:00+5:30
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे

Bigg Boss Marathi 2 : ही सदस्य झळकली होती हिना खानच्या लोकप्रिय हिंदी मालिकेत
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तसेच बिग बॉसच्या घरातील सदस्य वीणा जगताप बिग बॉसमुळे घराघरात पोहचली आहे आणि तिला प्रेक्षकांचा खूप चांगला पाठिंबा मिळतो आहे. वीणाने कलर्स मराठी वाहिनीवरील राधा प्रेम रंगी रंगले या मालिकेत काम केलं होतं. या मालिकेत तिने साकारलेली राधाची भूमिका प्रेक्षकांना खूप भावली होती. फार कमी लोकांना माहित आहे की, वीणाने हिना खानची मुख्य भूमिका असलेली व लोकप्रिय ठरलेली हिंदी मालिका ये रिश्ता क्या कहलाता हैमध्ये काम केलं होतं.
२०१५ साली प्रसारीत झालेल्या ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेत वीणानं निशाची भूमिका साकारली होती. तिची निगेटिव्ह भूमिका असून ती रोहन मेहरा उर्फ नक्ष सोबत दिसली होती.
ती या मालिकेत एका फ्रॉड व्यक्तीच्या भूमिकेत दिसली होती. हा तिचा केमिओ असला तरी तो मालिकेतील ट्रॅकसाठी महत्त्वाचा होता. नक्षला निशा फसवते आणि त्यानंतर त्याचा महिलांवरील विश्वास उडतो. त्यामुळे मालिकेत नवा ट्विस्ट व वळण येत असल्याचं पहायला मिळालं होतं.
वीणा सध्या बिग बॉसच्या घरात पहायला मिळत आहे. ती घरातील इतर सदस्यांसोबत भांडणं व स्पर्धा करताना दिसते.
वीणा व शिवानीमध्ये ३६चा आकडा असून त्या दोघींचे वाद व स्पर्धा पहायला मिळते. तसेच शिव ठाकरेसोबत अफेयर असल्याचीही चर्चा वारंवार ऐकायला मिळते.