Bigg Boss Marathi 2 : किशोरी शहाणे यांनी सांगितले अभिनयात कसा मिळाला पहिला ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 19:47 IST2019-08-21T19:40:16+5:302019-08-21T19:47:15+5:30

'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये किशोरी शहाणे इंडस्‍ट्रीमध्‍ये त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात कशाप्रकारे केली याबाबत सांगताना दिसत आहेत.

Bigg Boss Marathi 2 : marathi actress kishori shahane told about acting journey | Bigg Boss Marathi 2 : किशोरी शहाणे यांनी सांगितले अभिनयात कसा मिळाला पहिला ब्रेक

Bigg Boss Marathi 2 : किशोरी शहाणे यांनी सांगितले अभिनयात कसा मिळाला पहिला ब्रेक

ठळक मुद्देआठवीत असताना पेपरमध्‍ये एक जाहिरात आली होती. 'दुर्गा झाली गौरी' ही नृत्‍यनाटिका बनतेय, त्‍याच्‍यासाठी बालकलाकार हवे आहेत. माझे तिथे सिलेक्‍शन झाले आणि तिथून अभिनयप्रवासाला सुरुवात झाली.

बिग बॉस घरातील प्रत्‍येक स्‍पर्धकामध्‍ये प्रतिभा ठासून भरलेली आहे. त्‍यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच त्यांना आज इतके यश मिळाले आहे. बिग बॉस मराठी 2 मध्ये आता विजेता कोण ठरणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. प्रत्येकजण आपला आवडता स्पर्धक विजेता ठरावा यासाठी प्रयत्न करत आहे. आता वूटवरील 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये किशोरी शहाणे इंडस्‍ट्रीमध्‍ये त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात कशाप्रकारे केली याबाबत सांगताना दिसत आहेत.

आरोह किशोरी शहाणे यांना विचारतो, ''तुमचे बाबा काय करायचे?'' त्‍यावर त्या सांगतात, ''मॅनेजर होते, तेव्‍हाचे सीईओ म्‍हणता येतील... जे बॉस होते त्‍यांचे राइट हँड. दोन फॅक्‍टरींमध्‍ये त्‍यांनी जॉब केला. आमच्या तिन्ही बहिणींचे पालनपोषण खूपच चांगल्याप्रकारे केले. मी मधली, मला एक मोठी बहीण आहे आणि एक छोटी. अनुराधा, किशोरी आणि वैशाली अशा आम्‍ही तिघी. वैशाली एअर हॉस्‍टेस आहे आणि मोठी बहीण कॅनडाला असते... तिथे ती शाळेत लहान मुलांना शिकवते. 

त्‍यानंतर किशोरी त्यांच्या करियरच्‍या जुन्‍या आठवणींना उजाळा देत सांगतात, ''आम्‍ही तिघी अतिशय कर्तबगार निघालो... आपलं आपलं करिअर खूप चांगल्याप्रकारे केले. मी या फिल्‍डमध्‍ये योगायोगानेच आली. आठवीत असताना पेपरमध्‍ये एक जाहिरात आली होती. 'दुर्गा झाली गौरी' ही नृत्‍यनाटिका बनतेय, त्‍याच्‍यासाठी बालकलाकार हवे आहेत. नृत्‍याची जाण असणारे असे त्यात लिहिले होते. मी नृत्य शिकले नव्‍हते. पण मी ती जाहिरात वाचली आणि डॅडीला म्‍हटलं की, मला येथे जायचं आहे... त्यामुळे ते मला दादरला घेऊन गेले. माझे तिथे सिलेक्‍शन झाले. खरे तर मी आणि वैशाली दोघी गेलो होतो. पण तिने काही फॉलो-अप घेतला नाही. पण मी तिथेच त्‍यांच्‍या ग्रुपला चिकटून राहिले.'' 

त्या पुढे सांगतात, ''त्‍यानंतर मग राज्यस्तरीय नाटक स्पर्धेत भाग घेतला. वामन केंद्रेने दिग्दर्शित केलेल्या 'शतुरमुर्ग' या हिंदी नाटकात काम केले. असे करता करता मग 'मोरूची मावशी' या व्‍यावसायिक नाटकात काम करण्याची संधी मिळाली. अभिनयक्षेत्राविषयी मला आवड असल्याने मी नाटकात, चित्रपटांत काम करतच राहिले.

Web Title: Bigg Boss Marathi 2 : marathi actress kishori shahane told about acting journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.