‘बिग बॉस मराठी 2’फेम शिव ठाकरेनं शेअर केला ‘लव्ह’सोबतचा फोटो, पाहा कोण आहे त्याची लेडी ‘लव्ह’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 15:10 IST2022-02-11T15:08:18+5:302022-02-11T15:10:15+5:30
Shiv Thakare : होय, सध्या व्हॅलेन्टाईन वीक सुरू आहे आणि व्हॅलेन्टाईननिमित्त शिवने त्याच्या इन्स्टास्टोरीवर त्याच्या ‘लव्ह’चा फोटो शेअर केला आहे.

‘बिग बॉस मराठी 2’फेम शिव ठाकरेनं शेअर केला ‘लव्ह’सोबतचा फोटो, पाहा कोण आहे त्याची लेडी ‘लव्ह’
‘बिग बॉस मराठी 2’ ( Bigg Boss Marathi 2) मुळे घराघरात पोहोचलेला, सर्वांचा लाडका शिव ठाकरे (Shiv Thakare) बिग बॉसच्या घरातच प्रेमात पडला होता. होय, अभिनेत्री वीणा जगतापसोबतचं त्याचं नातं बिग बॉसच्या घरातचं फुललं होतं. अगदी घराबाहेर आल्यानंतरही त्यांच्या प्रेमाच्या जोरदार चर्चा होत्या. यादरम्यान दोघांनीही एकमेकांसोबत फोटो व व्हिडीओ शेअर करण्याचा अक्षरश: धडाका लावला होता. अर्थात यानंतर अचानक बिनसलं आणि दोघांच्या ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या. तूर्तास तरी वीणा व शिवच्या नात्यावर आम्ही काहीही बोलणार नाही. आम्ही बोलणार आहोत ते शिवच्या लाडक्या ‘लव्ह’बद्दल.
होय, सध्या व्हॅलेन्टाईन वीक सुरू आहे आणि व्हॅलेन्टाईननिमित्त शिवने त्याच्या इन्स्टास्टोरीवर त्याच्या ‘लव्ह’चा फोटो शेअर केला आहे. ‘पुढच्या स्टोरीमध्ये मी माझ्या लव्हचा फोटो शेअर करण्याचा विचार करतोय, तुम्हाला काय वाटतं?’असं पहिल्या स्टोरीमध्ये त्याने लिहिलं आहे आणि दुसऱ्या स्टोरीमध्ये ‘लव्ह’सोबतचा फोटो शेअर केला आहे. त्याची ही ‘लव्ह’ दुसरी तिसरी कुणी नसून त्याची आजी आहे.
होय, शिव त्याच्या आजीवर जिवापाड प्रेम करतो. तिच्यासोबतचे अनेक फोटो, व्हिडीओ तो सतत शेअर करत असतो. या व्हिडीओत शिव आज्जीसोबत धम्माल करताना दिसतो.
मूळ अमरावतीच्या शिवने बिग बॉसच्या घरात पहिल्यापासूनच आपली वेगळी छाप निर्माण केली होती. एमटीव्हच्या ‘रोडीज’मधून शिव ठाकरे हा मराठमोळा स्पर्धक नावारूपास आला. ‘रोडीज’ त्या पर्वात त्याने सेमीफायनलपर्यंत मजल मारली होती.
शिव अमरावती जिल्ह्यात लहानाचा मोठा झालाय. शिव एक नृत्यदिग्दर्शक आहे. नृत्यदिग्दर्शक म्हणून जम बसण्याआधी त्यानं अनेकदा स्टेज परफॉर्मन्स केलेत. तर, शाळेतील मुलांना डान्स शिकवायला तो जायचा. तेव्हा लोकांना त्याचा डान्स आवडायला लागला. त्यातून मिळालेल्या पैशातून तो इंजिनीअर झाला. मात्र, व्यवसाय म्हणून त्यानं नृत्यदिग्दर्शक व्हायचं निवडलं. घरची परिस्थिती बेताची असल्यानं भल्या पहाटे आपण दूध आणि पेपर टाकायचं काम देखील करायचो, असं त्यानं ‘बिग बॉस’च्या घरात सांगितलं होतं.