बिग बॉस मराठी २ : बिग बॉसच्या घरात आलेले गेस्ट दुसऱ्या सीझनमधील सदस्यांना देताहेत अशाप्रकारे त्रास
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 17:27 IST2019-07-05T17:23:45+5:302019-07-05T17:27:34+5:30
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दोन नाव खूप चर्चेत आहेत आणि ती म्हणजे वीणा आणि शिव.

बिग बॉस मराठी २ : बिग बॉसच्या घरात आलेले गेस्ट दुसऱ्या सीझनमधील सदस्यांना देताहेत अशाप्रकारे त्रास
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दोन नाव खूप चर्चेत आहेत आणि ती म्हणजे वीणा आणि शिव. कालच्या साप्ताहीक टास्क मध्ये या दोघांनाही सुंदर डान्स सादर केला. परंतु शर्मिष्ठा, पुष्कर, सई आणि स्मिता मध्ये असे ठरले आपण भांडण झाले असे त्यांना दाखवू बघुया पुढे काय होते. यानुसार शर्मिष्ठाने सांगितले मला पोहे खायचे आहे तर पुष्कर आणि सईचे म्हणणे पडले आम्हांला डान्स बघायचा आहे.
शेवटी शर्मिष्ठाने सांगितले डान्स करत करत पोहे बनव आणि त्यानुसार सुरेखा ताईने गाणे म्हटलं चोरीचा मामला आणि पोहे करता करताच शिव आणि वीणाने खूपच सुंदर डान्स सादर केला. जो घरात आलेल्या गेस्टना देखील खूप आवडला आणि त्यांनी एक स्टार देखील दिला.
परंतु हे करत असतानाच पोहे मात्र बिघडले. तर पुन्हा चविष्ट पोहे वीणाने शर्मिष्ठाला बनवून दिले. घरामध्ये आलेले गेस्ट खूपच प्रयत्न करत आहेत सदस्यांना त्रास देण्याचा परंतु त्यांचे काल म्हणणे पडले या सगळ्यांमध्ये खूपच पेशन्स आहेत कोणच चिडत नाही आणि उलट उत्तर देत नाहीये. काल घरातील सदस्यांना कल्पना आली आहे गेस्टच आपल्याला त्रास देण्यासाठी काहीना काही घटना घडवून आणत आहेत.
अभिजीत केळकरचे म्हणणे पडले, “सूपमध्ये केस येणे, बेडवर माश्या सापडणे, हे सगळं तेच करत आहेत”. हे गेस्ट सदस्यांना आज कोण कोणते टास्क देणार ? हे बघणे रंजक असणार आहे... तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.