बिग बॉस मराठी 2: 'या' कारणामुळे पहिल्याच दिवशी चर्चेत राहिले बिग बॉसचे घर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 14:34 IST2019-05-27T14:08:07+5:302019-05-27T14:34:39+5:30
बिग बॉस मराठी सिझन २ ची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगली... स्पर्धक कोण असतील ? घरं कसे असेल ? या बद्दलची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात होती.

बिग बॉस मराठी 2: 'या' कारणामुळे पहिल्याच दिवशी चर्चेत राहिले बिग बॉसचे घर
बिग बॉस मराठी सिझन २ ची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगली... स्पर्धक कोण असतील ? घरं कसे असेल ? या बद्दलची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात होती... आणि यासगळ्यावरून पडदा उघडला... महेश मांजरेकर यांची धमाकेदार एन्ट्री झाली आणि याचसोबत हर्षद नायबळ याने पुन्हाएकदा सगळ्याची मने जिंकली...किशोरी शहाणे, शिवानी सुर्वे, सगळ्यांची लाडकी राधा म्हणजेच विणा जगताप, सुरेखा पुणेकर, वैशाली माडे यांचे एका पेक्षा एक परफॉर्मन्स सादर झाले... किशोरी शहाणे यांची बिग बॉस मराठी सिझन २ च्या घरात पहिली एन्ट्री झाली आणि त्यानंतर एक एककरून १४ सदस्य बिग बॉसच्या घरात गेले...बिग बॉस मराठीचे अलिशान घरं बघून सगळेच अवाक झाले...
बिग बॉसच्या घरामध्ये अभिजित बिचुकले चर्चेत राहिले ... मग ते शिवानी सुर्वेवर म्हटलेले गाणे असो वा घरामध्ये झालेला वाद असो वा बिग बॉस च्या घरामध्ये झालेली पहिली नॉमिनेशन प्रक्रिया असो ...शिवानी सुर्वे आणि शिव ठाकरे मध्ये घरामध्ये एन्ट्री होताच वाद झाला आता तो कशा वरून झाला ? पुढे काय झालं ? हे आजच्या भागामध्ये कळेल...
सदस्यांचा पहिला दिवस कसा होता ? पहिल्या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये कोण कोण नॉमिनेट झाले ? हे बघणे रंजक ठरणार आहे...