अंबानीनंतर विकी भैय्याच! Bigg Boss फेम तहलकाने दाखवली अंकिता-विकीच्या आलिशान घराची झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 13:41 IST2024-02-02T13:40:34+5:302024-02-02T13:41:05+5:30
तीन स्वीमिंग पूल, होम थिएटर...संपता संपत नाही विकी भैय्याचं घर

अंबानीनंतर विकी भैय्याच! Bigg Boss फेम तहलकाने दाखवली अंकिता-विकीच्या आलिशान घराची झलक
'बिग बॉस'चा १७ वा (Bigg Boss 17) सीझन काही दिवसांपूर्वीच संपला. मुनव्वर फारुकी या पर्वाचा विजेता ठरला. टीव्हीवरची लोकप्रिय सून अंकिता लोखंडेला(Ankita Lokhande) टॉप 3 पर्यंत जाता आले नाही हे पाहून अनेकांना धक्काच बसला होता. हा सीझन खरंतर अंकिता आणि तिचा पती विकी जैन (Vicky Jain) यांच्यामुळे जास्त चर्चेत राहिला. दोघांमधील भांडणं अक्षरश: घटस्फोटापर्यंत गेली होती. अंकिताच्या सासूने नॅशनल टेलिव्हिजनवरच तिला सुनावलं होतं. आता बिग बॉस संपलं आहे आणि अंकिता-विकी पुन्हा त्यांच्या झोनमध्ये आहेत. दोघांचा संसार सुरळीत सुरु आहे. नुकतंच बिग बॉसचा स्पर्धल तहलका उर्फ सनी आर्याने (Sunny Arya) अंकिता-विकीच्या घराची झलक इन्स्टाग्रामवर दाखवली. विकीचं आलिशान घर अंबानीपेक्षा कमी नाही असंही तो म्हणाला.
सनी आर्या तहलका नावाने युट्यूबवर प्रसिद्ध आहे. त्याचे व्हिडिओ कायम चर्चेत असतात. बिग बॉस संपल्यानंतर आता तो प्रत्येक स्पर्धकाच्या घरी जाऊन त्यांना भेटत आहे. नुकताच तो विकी-अंकिताच्या मुंबईतील घरी पोहोचला. त्यांचं घर पाहून तहलकाला धक्काच बसला. तीन स्वीमिंग पूल, होम थिएटर, संपता संपत नाही विकीचं घर अशीच प्रतिक्रिया त्याने व्हिडिओ शेअर करत दिली. तसंच अंबानींनंतर विकी जैनचंच घर सर्वात आलिशान असणार असंही तो म्हणाला. तहलकाने व्हिडिओमधून अंकिता-विकीच्या घराची झलक दाखवली आहे.
बिग बॉसमुळे अंकितासोबतच विकीलाही कमालीची प्रसिद्धी मिळाली आहे. त्याचाही आता वेगळा चाहतावर्ग तयार झालाय. अंकितापेक्षा जास्त प्रेक्षकांनी विकीलाच पाठिंबा दिला होता. घरातले सदस्यही त्याला आदराने 'विकी भैय्या' म्हणायचे. विकी जैन मोठा उद्योगपती आहे. त्याची कोट्यवधीची संपत्ती आहे. अंकिता आणि विकी मुंबईतील महागड्या आलिशान घरात राहतात. अंकिता अनेकदा घरातील फोटो शेअर करत असते.
बिग बॉसची ट्रॉफी हरली असली तरी अंकिताला बॉलिवूडमध्ये सिनेमा मिळाला आहे. रणदीप हुडाच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमात अंकिताची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे अंकिताचं नशीब फळफळलं आहे.