शिव ठाकरेचं लग्न ठरलं? अभिनेत्याने 'तो' फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; कोण आहे ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 09:54 IST2026-01-12T09:52:43+5:302026-01-12T09:54:28+5:30
शिव ठाकरेच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे सर्वांना सुखद धक्का बसला

शिव ठाकरेचं लग्न ठरलं? अभिनेत्याने 'तो' फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; कोण आहे ती?
शिव ठाकरे हा मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि मॉडेल. शिवने बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचं विजेतेपद पटकावलं आहे. अशातच शिव ठाकरेने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे आणि चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. शिवने मुंडावळ्या घातलेला खास फोटो शेअर करत लग्नाची गुड न्यूज दिल्याची चर्चा आहे. शिवसोबत त्याची बायकोही दिसत आहे.
शिवचं लग्न ठरलं?
बिग बॉस फेम अभिनेता शिव ठाकरेने Finally असं कॅप्शन देत ही गुड न्यूज सर्वांना दिली आहे. शिवने मुंडावळ्या बांधल्या असून त्याची बायको त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन लाजताना दिसत आहे. शिवने बायकोचा चेहरा सर्वांना दाखवला नाहीये. शिवच्या मागे त्याचे मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक आनंदी दिसत आहेत. शिवने हा फोटो शेअर करताच त्याचे चाहते आणि इंडस्ट्रीतील सहकलाकारांनी त्याचं अभिनंदन करुन त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. शिवचा हा फोटो अचानक समोर आल्याने सर्वांना सुखद धक्का बसला आहे.
याशिवाय या फोटोची दुसरी बाजू अशी की, शिवने लग्न केलं नसून हा फोटो त्याच्या आगामी प्रोजेक्ट संदर्भात असल्याचंही बोललं जातंय. आता याविषयी खरं काय हे शिव लवकरच स्पष्ट करेल, अशी सर्वांना आशा आहे. शिव ठाकरेचं याआधी अभिनेत्री वीणा जगतापसोबत नाव जोडलं होतं. दोघांनी त्यांच्या नात्याची कबुलीही दिली होती. परंतु काही दिवसांनंतर दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगली. त्यामुळे शिवसोबत फोटोत असणारी ती कोण, याविषयी अद्याप माहिती मिळाली नसली तरीही शिव लवकरच याचा उलगडा करेल, अशी शक्यता आहे.