Bigg Boss फेम पवित्रा पुनियाच्या वडिलांचं निधन; अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 18:32 IST2023-11-09T18:31:31+5:302023-11-09T18:32:00+5:30

'बिग बॉस' फेम अभिनेत्री पवित्रा पुनियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पवित्राचे वडील कुशल पाल सिंह यांचं निधन झालं आहे.

bigg boss fame pavitra puniya father died actress said toughest time of my life | Bigg Boss फेम पवित्रा पुनियाच्या वडिलांचं निधन; अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर

Bigg Boss फेम पवित्रा पुनियाच्या वडिलांचं निधन; अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर

'बिग बॉस' फेम अभिनेत्री पवित्रा पुनियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पवित्राचे वडील कुशल पाल सिंह यांचं निधन झालं आहे. ६ नोव्हेंबरला वडिलांचं निधन झाल्याची माहिती पवित्राने दिली आहे. पवित्राचे वडील दिल्ली पोलिसांतून निवृत्त झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. अखेर सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. 

पवित्राने नुकतीच ईटाइम्सला मुलाखत दिली. यामध्ये तिने वडिल्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. पवित्रा म्हणाली, "माझे वडील फ्लॅटमधील बाल्कनीमध्ये साफसफाई करताना पडले होते. त्यावेळी त्यांना दुखापत होऊन फ्रॅक्चर झालं होतं. गेल्या काही महिन्यांपासून ते बेड रेस्टवर होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. पण, काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार झाल्यानंतर त्यांना आम्ही घरी घेऊन आलो होतो. ते ठीक होत होते. पण, ६ नोव्हेंबरला अचानक त्यांची प्रकृती बिघडली. माझ्या आईने मला फोन करुन बोलवलं. पण, ते आम्हाला सोडून गेले होते." 

"मी सध्या आयुष्यातील कठीण प्रसंगाचा सामना करत आहे. माझी आई आणि भाऊ त्यांची काळजी घेत होते. त्यांना आता धीर कसा देऊ, हे मला कळत नाहीये. पण, माझ्या कुटुंबासाठी मला धीट बनावं लागेल," असंही ती भावुक होत म्हणाली. 'बिग बॉस १४'मध्ये पवित्रा सहभागी झाली होती. या शोमुळे तिला लोकप्रियता मिळाली.

Web Title: bigg boss fame pavitra puniya father died actress said toughest time of my life