'एक नंबर तुझी कंबर'ची हिंदी अभिनेत्रीला भुरळ, साडी नेसून मराठी गाण्यावर थिरकली, पाहा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 16:18 IST2025-06-05T16:17:01+5:302025-06-05T16:18:53+5:30
मराठी सेलिब्रिटींनी 'एक नंबर तुझी कंबर' गाण्यावर डान्स करत रील बनवला आहे. आता हिंदी अभिनेत्री ईशा मालवीय हिलादेखील या गाण्याची भुरळ पाडली आहे. ईशाने या गाण्यावर रील बनवला आहे.

'एक नंबर तुझी कंबर'ची हिंदी अभिनेत्रीला भुरळ, साडी नेसून मराठी गाण्यावर थिरकली, पाहा व्हिडिओ
सोशल मीडियावर गाण्यांचा ट्रेंड रोज बदलत असतो. रोज नवी गाणी सोशल मीडियावर ट्रेंड होत असतात. संजू राठोडच्या 'गुलाबी साडी'ने सोशल मीडिया दणाणून सोडलं होतं. 'गुलाबी साडी'नंतर संजू राठोडच्या आणखी एका गाण्याने सोशल मीडियाला भुरळ पाडली आहे. 'एक नंबर तुझी कंबर' हे गाणं सध्या इन्स्टावर ट्रेंडिंग आहे. या गाण्यावरील अनेक रील्स व्हायरल होत आहेत. अनेक सेलिब्रिटींनाही या गाण्यावर थिरकण्याचा मोह आवरता येत नाहीये.
मराठी सेलिब्रिटींनी 'एक नंबर तुझी कंबर' गाण्यावर डान्स करत रील बनवला आहे. आता हिंदी अभिनेत्री ईशा मालवीय हिलादेखील या गाण्याची भुरळ पाडली आहे. ईशाने या गाण्यावर रील बनवला आहे. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. साडी नेसून 'एक नंबर तुझी कंबर' गाण्याच्या हुक स्टेप्स ईशा करताना दिसत आहे. ईशाचा हा व्हिडिओ चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे.
'गुलाबी साडी'नंतर संजू राठोडच्या 'एक नंबर तुझी कंबर' गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. या गाण्यात ईशा मालवीयनेच डान्स केला आहे. ईशा हा हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. 'बिग बॉसम'ध्येही ती सहभागी झाली होती. ईशा 'बिग बॉस'च्या घरातील चर्चेतील अभिनेत्री होती. 'बिग बॉस'मुळे ईशा प्रसिद्धीझोतात आली.