मुल दत्तक घेतल्याने बिग बॉस फेम अभिनेत्रीला अटक! नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 13:02 IST2024-03-22T13:01:28+5:302024-03-22T13:02:52+5:30

बिग बॉस फेम अभिनेत्रीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, कारण ऐकून बसेल धक्का

Bigg Boss fame actress sonu gowda arrested, accused of illegally adopting a child | मुल दत्तक घेतल्याने बिग बॉस फेम अभिनेत्रीला अटक! नेमकं प्रकरण काय?

मुल दत्तक घेतल्याने बिग बॉस फेम अभिनेत्रीला अटक! नेमकं प्रकरण काय?

प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉस कन्नडमुळे लोकप्रिय झालेली सोनू श्रीनिवास गौडा हिला बेंगळुरुमधून अटक करण्यात आली  आहे. मुल दत्तक घेताना कायदेशीर प्रक्रियेचं योग्य पालन न केल्याने सोनूला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. काही दिवसांपुर्वी सोनूने ८ वर्षांच्या मुलीला दत्तक घेण्याची घोषणा केली होती. परंतु मुल दत्तक घेताना योग्य अटींचं पालन न केल्याने पोलिसांनी सोनूला अटक केली आहे. 

मुल दत्तक घेताना सोनूने कोणत्याही नियमांचं पालन केलं नाही. याशिवाय सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी तिने मुल दत्तक घेतलं, असा दावा पोलीस अधिकाऱ्यांनी केलाय. बाल संरक्षण कार्यालय आणि स्थानिक बेंगळुरू पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईनंतर शुक्रवारी सकाळी सोनूला अटक करण्यात आली. तिच्याविरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

बाल संरक्षण कार्यालयाने सोनूच्या विरोधात केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सोशल मीडिया सेन्सेशन आणि अभिनेत्री सोनूने "अनावश्यक सहानुभूती" आणि मुलाला "सेलिब्रेटी स्टेटस" मिळवून देण्यासाठी दत्तक घेतलं. अजुनतरी याप्रकरणी सोनूचा अधिकृत खुलासा समोर आला नाहीय. 

Web Title: Bigg Boss fame actress sonu gowda arrested, accused of illegally adopting a child