३९ व्या वर्षी 'बिग बॉस' अभिनेत्री देतेय गंभीर आजाराशी झुंज, ९ किलो वजन कमी झालं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 12:27 IST2025-10-05T12:22:42+5:302025-10-05T12:27:27+5:30
बिग बॉस फेम अभिनेत्री गंभीर आजारांशी झुंज देत असून काहीच महिन्यांपूर्वी तिचा घटस्फोट झाला आहे

३९ व्या वर्षी 'बिग बॉस' अभिनेत्री देतेय गंभीर आजाराशी झुंज, ९ किलो वजन कमी झालं अन्...
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि 'बिग बॉस १३' फेम रश्मी देसाईने (Rashami Desai) तिच्या वैयक्तिक प्रवासाबद्दल नुकताच खुलासा केला आहे. रश्मी सध्या गंभीर आरोग्य समस्यांशी लढत आहे. घटस्फोटानंतर ती एकटी राहत असून, सध्या ती आयुष्यातील विविध समस्यांचा सामना करत आहे. काय म्हणाली रश्मी? जाणून घ्या
'उतरन' मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या रश्मी देसाईने सांगितलं की, वजन कमी करण्याचा प्रवास सोपा नव्हता. तिला अनेक आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे. "हा प्रवास सोपा नव्हता. मला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. पण मला विश्वास आहे की मी ते करू शकेन, कारण माझा स्वतःवर विश्वास आहे," असं रश्मीने सांगितलं. वजन कमी करण्याच्या या प्रवासाने रश्मीला संयम, आत्मविश्वास आणि आरोग्याला प्राधान्य देण्याचं महत्त्व शिकवलं आहे.
घटस्फोटानंतरचे आयुष्य आणि बॉडी शेमिंग:
२०१६ मध्ये पती नंदीश संधू (Nandish Sandhu) यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतर रश्मी देसाई सध्या एकटी राहत आहे. तिने आयुष्याचा अर्थ समजावून सांगताना म्हटलं की, 'आपण स्वतःकडून खूप अपेक्षा ठेवतो आणि हेच मला आता जाणवलं आहे.' यापूर्वी, एका सोहळ्यातील फोटोंवरून तिला बॉडी शेमिंगचा (Body Shaming) सामना करावा लागला होता. याबद्दल बोलताना ती म्हणाली, "मी नेहमी २१-२२ वर्षांची दिसू शकत नाही. माझा प्रवास सुंदर आहे, पण काही लोकांसाठी माझा बदल स्वीकारणं कठीण होतं." रश्मी देसाईला २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'माँ तने नै समज' या गुजराती चित्रपटात आणि २०२३ मध्ये 'रात्री के यात्री २' या वेबसीरिजमध्ये पाहण्यात आले होते.