एजाज खानसोबत सात फेरे घेणार पवित्रा पुनिया? अभिनेत्रीने केला लग्नाबाबत खुलासा; म्हणाली- कधीही अचानक...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 15:48 IST2022-12-24T15:43:24+5:302022-12-24T15:48:36+5:30
काही महिन्यांपूर्वीच दोघांनी साखरपुडा केला आहे. आता अभिनेत्रीने तिच्या लग्नाचा प्लान सांगितला आहे.

एजाज खानसोबत सात फेरे घेणार पवित्रा पुनिया? अभिनेत्रीने केला लग्नाबाबत खुलासा; म्हणाली- कधीही अचानक...
Pavitra Punnia On Wedding With Eijaz Khan: वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉसच्या घरात किती तरी कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडतात. काहीची लव्हस्टोरी घरातच संपत तर काहीचं नातं टिकतं. अभिनेत्री पवित्रा पुनिया (Pavitra Punia) आणि अभिनेता एजाज खान (Eijaz Khan) या स्टार कपलची जोडी ही यातील एक आहे. 'बिग बॉस 14' दरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलं. दोन वर्षांपासून दोघे रिलेशनशीपमध्ये आहे. काही महिन्यांपूर्वीच दोघांनी साखरपुडा देखील केला आहे. आता अभिनेत्रीने तिच्या लग्नाचा प्लान सांगितला आहे.
पवित्रा पुनियाने एका मुलाखतीत सांगितले आहे की ती कधीही लग्न करू शकते. त्यांच्या एंगेजमेंटप्रमाणेच त्यांचे लग्नही अचानक होणार आहे. पवित्रा म्हणाली, “तुम्ही ऑक्टोबरमध्ये एंगेजमेंटचे फोटो पाहिलं त्याचप्रमाणेच आमचं लग्नही कधीही अचानक होईल. आम्हाला कोणतीही प्लान नाही करायचा आहे. जेव्हा व्हायचं तेव्हा ते व्हाईल आणि मग मी ही बातमी जगाला सांगेन. त्याआधी मला काही बोलायचे नाही."
पवित्रा म्हणाली की, तिच्या आणि एजाजच्या नात्यात अनेक चढ-उतार आले आहेत. अभिनेत्री म्हणाली, “मला वाटतं नाही की कोणतेही नाते सोपे असते. पवित्राने असेही सांगितले की दोघेही सध्या आनंदी वातावरणात आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहेत.
पवित्रा पुनिया-एजाज खान यांची एंगेजमेंट
ऑक्टोबर 2022 मध्ये, एजाज खानने डिनर डेटवर पवित्रा पुनियाला डायमंड रिंगसह प्रपोज केले. अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती.